cm eknath shinde, Shaina NC and Arvind Sawant saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : बाळासाहेब असते तर...; शायना एनसींबाबत केलेल्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे आक्रमक

Eknath Shinde On Arvind Sawant Controversial statement On Shaina NC : शायना एनसी यांच्याबाबत अरविंद सावंत यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरं तर असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे, असं ते म्हणाले.

Nandkumar Joshi

Eknath Shinde : आम्हाला इम्पोर्टेड माल नको, आमचा ओरिजिनल माल आहे, असं वक्तव्य केल्यानं ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत अडचणीत आले आहेत. शायना एनसी यांनी तक्रार केल्यानंतर सावंतांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. बाळासाहेब असते आणि कुणी शिवसैनिकानं असं वक्तव्य केलं असतं तर, त्याचं थोबाड फोडलं असतं, असं शिंदे म्हणाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी अमिन पटेल यांच्या प्रचारावेळी एक वक्तव्य केलं होतं. आम्हाला इम्पोर्टेड माल नको, आमचा ओरिजिनल माल आहे, असं सावंत म्हणाले होते. शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांनी सावंतांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी सावंतांवर गुन्हा दाखल केला. ऐन निवडणुकीत अरविंद सावंत यांच्या अडचणीत भर पडली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून महिलांना सन्मान दिला जात नाही. त्यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यावर महिला शांत बसणार नाहीत, अशा शब्दांत शायना एनसी यांनी इशारा दिला. तर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, असं स्पष्टीकरण सावंतांनी दिलं.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

शायना एनसी यांच्याबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी अरविंद सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. खरं म्हणजे असं वक्तव्य दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात महिलांचा अपमान केला गेला. ज्यांनी अपमान केला, त्यांना लाडक्या बहिणी घरी बसवून त्यांची जागा दाखवून देतील, असं शिंदे म्हणाले.

बाळासाहेब असते तर आणि कुणी शिवसैनिकानं असं वक्तव्य केलं असतं, तर त्याचं थोबाड फोडलं असतं. सगळ्या लाडक्या बहिणी मिळून अपमान करणाऱ्यांचा बदला घेतील आणि निवडणुकीमध्ये त्यांना कायमचं घरी बसवतील, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

अरविंद सावंतांच्या अडचणी वाढणार?

अरविंद सावंत यांच्या वक्तव्याची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. अरविंद सावंत यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे, असे राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे. आयोगाकडून केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुंबई पोलिसांना सूचना केल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिले आहेत. अशा वक्तव्यांवर निवडणूक आयोगानेही कारवाई करावी, अशा सूचना रहाटकर यांनी निवडणूक आयोग आणि मुंबई पोलिसांना केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT