Eknath Shinde  saam tv
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदे आता भाजपला टशन देणार, उत्तर भारताच्या मैदानात शिलेदार उतरवणार, नेत्यांना दिला कानमंत्र

Shiv Sena Expansion News : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा देशभर विस्तार करण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह २५ राज्यांमध्ये संघटन मजबूत करण्यासाठी राज्यप्रमुखांना ॲक्शन प्लॅन, सदस्य नोंदणी आणि तळागाळातील विस्ताराचे निर्देश देण्यात आले आहेत.

Namdeo Kumbhar

Eknath Shinde, Shiv Sena : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या रणनीतीची सध्या राज्यात चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव असलेल्या शिंदे सेनेचा विस्तार आता देशभर करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह विविध राज्यांमध्ये पक्षाची संघटनात्मक ताकत वाढवण्यासाठी शिंदेंनी राज्यप्रमुखांना कानमंत्र दिला आहे. उत्तर भारतात शिंदेंची शिवसेना भाजपला टशन देणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना राज्य प्रमुखांना आवाहन

शिवसेना हा सर्वसामान्य जनतेचा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष असून पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने आपल्या लोककल्याणकारी कामाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शिवसेना पोहोचवावी, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच शिवसेना देशातील २५ राज्यांत रुग्णवाहिका देणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी यावेळी केली.

नवी दिल्ली येथे आयोजित विविध राज्यांच्या शिवसेना राज्यप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्यासह दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, ओडिशा, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या देशातील १५ राज्यांतील राज्यप्रमुखांसह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

गरज पडल्यास 'शिवसेना स्टाईल'ने आंदोलने

शिक्षण, क्रीडा, रोजगार, महिला, आरोग्य, पाणी, रस्ते आणि कृषी या मुद्द्यांवर प्रभावी पद्धतीने काम करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. तसेच, सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी गरज पडल्यास आपापल्या राज्यात 'शिवसेना स्टाईल'ने आंदोलने करण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

पक्षाची पकड तळागाळात अजून मजबूत करण्यासाठी येत्या काही महिन्यांत विविध राज्यांमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

संघटनात्मक बांधणी

पक्षवाढीला गती देण्यासाठी सर्व राज्यांमध्ये त्वरित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पूर्ण कराव्यात. यामध्ये प्रामुख्याने राज्यस्तरीय पदाधिकारी, महिला आघाडी प्रमुख, युवासेना आणि इतर अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जावी असेही त्यांनी सांगितले.

सर्व राज्यप्रमुखांनी आपापल्या राज्यांतील राजकीय, सामाजिक परिस्थिती आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पुढील दोन महिन्यांत ठोस 'कृती आराखडा' (Action Plan) पक्ष नेतृत्वाला सादर करावा असेही निर्देश दिले.

पक्षाची व्याप्ती वाढवण्यासाठी सर्व राज्यांमध्ये व्यापक स्तरावर 'शिवसेना सदस्य नोंदणी अभियान' राबवून पक्ष शेवटच्या गावापर्यंत आणि घरापर्यंत पोहोचवावा असेही या बैठकीत शिंदे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात उद्या गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे अनेक प्रमुख रस्ते बंद

PF Nominee Rules: PF खात्यात नॉमिनी नसेल तर पैसे कोणाला मिळतात? जाणून घ्या 'हा' नियम

NO UPI Day : मोठी बातमी! २ ऑक्टोबरला देशभरात NO UPI DAY; व्यापाऱ्यांनी का घेतलाय हा निर्णय?

EPFO death claim: कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला कसे मिळणार PF आणि विम्याची रक्कम? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Vidyanand Bapat: मोठी बातमी! विद्यानंद बापट राजकारणात येणार, स्वत:च केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT