Eknath Shinde group Saam TV
मुंबई/पुणे

मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी? दररोज होतेय नेतृत्वाला विचारणा

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन २६ दिवस झाले तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेतून बंडखोरी केलेले आमदार आणि भाजप एकत्र येत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर मंत्रिमंडळाचा विस्तार अजुनही झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटात नाराजी पसरल्याची माहिती मिळात आहे. (Eknath Shinde Latest News)

मंत्रिमंडळाचा मुहूर्त लांबल्याने शिंदे गटात अंतर्गत नाराजी पसरल्याची माहिती मिळत आहे. ईच्छुक आमदारांच्या मतदारसंघात नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यांचा शपथविधी झाल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अस सांगण्यात आले होते, पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. मतदारसंघात नाराजी पसरल्याची माहिती एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आमदार देत आहेत.

सरकार स्थापन होऊन २५ दिवस होऊन गेला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्यात चर्चा सुरू आहेत. विस्तार लवकरच होईल असं बोलले जात होते, पण अजुनही झालेला नाही, त्यामुळे शिंदे गटातील आमदार रोज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन खंत व्यक्त करत असल्याचे पाहायला मिळत आहे. (ShivSena Latest News)

भाजपच्या (BJP) हायकमांडकडून मंत्रिमंडळ विस्ताराला अजुनही हिरवा सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गटात अंतर्गत नाराजी पसरली आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Eknath Shinde Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही! चाणक्यांच्या 'या' स्मार्ट टिप्स फॉलो करा!

Maharashtra Live News Update: - यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे मुख्याधिकारी विरोधात मोर्चा

फ्रान्समध्ये गायींमध्ये कोरोना सदृश आजाराचा कहर, लंपीमुळे 3 हजार गायींचा मृत्यू

Mangalsutra Tradition: हातात मंगळसूत्र घातल्यानं नवरा-बायकोच्या नात्यावर काय होतो परिणाम?

भयंकर! कॉलेजमधून घरी जाताना वाटेत मृत्यूने गाठलं; भीषण अपघातात २ जिवलग मैत्रिणींचा करुण अंत

SCROLL FOR NEXT