Abdul Sattar Saam Tv
मुंबई/पुणे

शिंदे गटातील आमदारांचे मंत्रीपदासाठी लॉबिंग? अब्दुल सत्तार थेट दिल्लीत दाखल

सुमारे महिना उलटला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीतून अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार आता जुलै महिना संपला तरीही अजूनही झालेला नाही त्यामुळे विरोधकांनी हल्लाबोल सुरू केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी शपथ घेतली. मात्र सुमारे महिना उलटला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला असतानाही शिंदे गटात मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार दिल्लीत पोहोचले आहेत. सत्तार दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेणार आहेत. अशा स्थितीत आता मंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा आहे. (Eknath Shinde Latest News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणाला किती मंत्रीपदे मिळणार याबाबत चर्चा झाली आहे. मात्र अंतिम निर्णय झालेला नाही. ३ ऑगस्टच्या आत शपथविधी सोहळा होणार होईल, अशी माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही कोणत्याही अटीसह आलो नाही, मंत्रिपद द्यायचे की नाही हा त्यांचा निर्णय असून ते जो निर्णय घेतील तो योग्यच असेल असंही आमदार सत्तार म्हणाले.

मी आमदारकीचा राजीनामा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे विनंती करणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. राजीनामा देणारा मी आमच्या पन्नास आमदारांपैकी पहिला असेन. ३१ जुलै रोजी माझ्या मतदारसंघात महामेळावा आहे, यावेळी मुख्यमंत्र्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी मी राजीनामा देणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : विखे-पाटलांनी गड राखला! अहिल्यानगरच्या राहतामध्ये भाजपचा नगराध्यक्ष

Maharashtra Nagar Palika Election Result Live : नांदेडमध्ये भाजप आमदाराला धक्का, शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्ष

Ahilyanagar: माजी मंत्र्यांना नेवासामध्ये जोरदार झटका, नगरपंचायतीवर महायुतीची सत्ता, नगराध्यक्षपदी करण घुले

लाजच सोडली! नमो भारत एक्स्प्रेसमध्येच अश्लील चाळे, जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल

त्र्यंबकेश्वरमध्ये अजित पवार गटाचा विजय, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर साजरा केला जल्लोष|VIDEO

SCROLL FOR NEXT