Mohit Kamboj Saam Tv
मुंबई/पुणे

भाजप मोहित कंबोज यांना राज्यपाल नियुक्त आमदार करणार?; 'या' नेत्यांना मिळणार संधी

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत मोहित कंबोज यांना स्थान मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) कोसळत नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले होते, त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले होते. राज्यपाल भगतिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी परवानगी दिली. काल भाजपच्या (BJP) राहुल नार्वेकर यांना १६४ मत मिळाली. आता शिंदे-फडणवीस सरकार राज्यपाल यांना १२ आमदार नियुक्तीसाठी यादी देणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत मोहित कंबोज यांना स्थान मिळणार असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात त्यांचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे. मोहित कंबोज हे बंडखोर आमदारांसोबत सुरत तसेच गुवाहाटीमध्येही होते.

ठाकरे सरकार पाडण्यामागे मोहित कंबोज यांनी महत्वाची भूमिका बजावली होती, याचमुळे मोहित कंबोज यांना आमदारकीची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोहित कंबोज यांच्यासोबत पंकजा मुंडे यांनाही आमदारकी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच भाजपमध्ये अन्य नेत्यांची नावेही चर्चेत आहेत.

भाजपमधील या नेत्यांच्या नावांची चर्चा

पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, सदाभाऊ खोत, चित्रा वाघ, कृपाशंकर सिंह, मोहित कंबोज, माधव भंडारी, केशव उपाध्ये राज्यपाल नियुक्त आमदारीसाठी या नेत्यांची नावे सध्या चर्चेत आहे.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

शिवसेना आमदार अजय चौधरी यांचे शिवसेना (Shivsena) गटनेते पद रद्द करण्यात आलं आहे. तर सुनील प्रभू यांचे मुख्य प्रतोद पद रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिवालयचे शिवदर्शन साठ्ये यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या पक्षातर्फे शिंदेवर मोठी कारवाई केली होती. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवलं होतं. त्यांच्याजागी आमदार अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर राज्य विधिमंडळाने देखील अजय चौधरी यांच्या गटनेते पदी अधिकृत नियुक्ती करण्याच्या विनंतीला मान्यता दिली होती. मात्र, राज्यात शिंदे सरकार सत्तेवर येताच शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत; CM फडणवीसांचं झ्युरिचमध्ये ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या उद्घाटनप्रसंगी वक्तव्य

आई मला वाचव, श्वास घेता येत नाहीये; कारमध्ये वाढदिवसाची पार्टी करताना अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

Kolhapur Politics: कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना साथ साथ? कोल्हापूरात पडद्यामागे काय घडतयं?

बालेकिल्ला शाबूत, राज्यात शिंदेसेनेची पिछेहाट; अकार्यक्षम मंत्र्यांना 'डच्चू' मिळणार?

Bermuda Triangle: वसईजवळील समुद्रात 'बर्म्युडा ट्रॅंगल'? पालघर जिल्ह्याला भूकंपाचा धोका? मच्छिमारांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT