Eknath Shinde News, Shivsena Political Crisis Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena Political Crisis: एकनाथ शिंदे यांची तयारी दोन वर्षांपासूनच

शिंदे हे राज्यातील अनेक आमदार आणि पदाधिकाऱ्याशी वैयक्तिक संपर्कात होते. शिवाय त्यांनी अनेकांना निवडणुकांसाठी आर्थिक रसदही पुरवली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे हे मागील काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अशातच कालच्या विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्यावर महाविकास आघाडीला अपेक्षीत यश आलं नाही. दरम्यान महाविकास काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु असतानाच शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा राज्याते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काल रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत. (Eknath Shinde News)

शिवाय शिंदे हे सध्या गुजरातमधील (Gujarat) एका हॉटेलमध्ये थांबले असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे (Shivsena) अनेक आमदार देखील असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिंदे हे राज्यातील सरकारमधून ते बाहेर पडणार का? शिंदे यांच्या जाण्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडणार का अशा चर्चा सुरु आहेत. (Shivsena Political Crisis)

दरम्यान, एकनाथ शिंदेंची नाराजी आत्तापासून नसून मागील दोन वर्षापासूनच त्यांनी आपला स्वतंत्र गट तयार करण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या अशी माहिती आता समोर येत आहे.

हे देखील पाहा -

शिवसेनेचे एकनिष्ठ नेते आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासोबत काम केलेले नेते अशी ओळख असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट तयार करण्याच्या हालचाली दोन वर्षांपासूनच सुरू होत्या अशी माहिती समोर आली आहे.

त्यासाठी शिंदे हे राज्यातील अनेक आमदार आणि पदाधिकाऱ्याशी वैयक्तिक संपर्क होते. शिवाय त्यांनी अनेकांना निवडणुकांसाठी आर्थिक रसदही पुरवली असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय मंत्री म्हणून आमदारांची कामे करताना त्यांनी पुढाकार घेतला होता.

तसंच महापूर, कोरोना काळामध्ये (Corona) त्यांनी अनेकांना वैयक्तिक पातळीवर मदत केली मात्र, ती शिवसेना पक्ष म्हणून नव्हे तर स्वतः च्या नावाने मदत केली होती. आरोग्य सहाय्यता कक्षही स्वतः च्या आर्थिक रसदीवर त्यांनी चालवला होता.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

SCROLL FOR NEXT