Ramdas Kadam
Ramdas Kadam Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : अब्दुल सत्तारांनंतर आता रामदास कदमांची जीभ घसरली; अनिल परबांना केली शिवीगाळ

साम टिव्ही ब्युरो

Ramdas Kadam Offensive Statement : शिंदे-फडणवीस (Eknath Shinde)   सरकारमधील मंत्री तसेच नेत्यांचे काही वाचाळ विधाने थांबण्याचं नाव घेत नाहीये. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेलं विधान ताजं असतानाच, आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची सुद्धा जीभ घसरली आहे. माजी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविषयी बोलताना रामदास कदमांनी (Ramdas Kadam) अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. (Ramdas Kadam vs Anil Parab Latest News)

अनिल परब यांना उद्धव ठाकरे यांचे दलाल म्हणताना, रामदास कदमांनी शिवीगाळही केली आहे. उद्धव ठाकरे यांना असेच दलाल सोबत लागतात, असं रामदास कदम म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी आज रत्नागिरीत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार तसेच माजी परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली.

काय म्हणाले रामदास कदम?

"अनिल परब यांनी शिवसेनेच्या ताब्यात असलेली दापोली मंडलगड नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या घशात घातली. परब यांनी माझ्या योगेशदादावर अन्याय करून त्यांना बाजूला ठेऊन ही नगरपरिषद राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचं काम केलं. इतकंच नाही, तर अनिल परब यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे", असा आरोपही रामदास कदम यांनी केला.

पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले, 'उद्धवजींना असेच भ*** सोबत लागतात. मग ते अनिल परब असो, की विनायक राऊत असो. त्यांना अशीच दोन-चार माणसे लागतात. अशा *** जोपर्यंत उद्धव ठाकरे हे बाजूला करत नाही, तोपर्यंत त्यांच्या पक्षाचं काहीही होणार नाही', अशा शब्दात रामदास कदम यांनी शिवीगाळ केली आहे. विशेष बाब म्हणजे अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचं प्रकरण ताजं आहे. आता रामदास कदम यांनी अनिल परब यांना शिवीगाळ केल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

CM शिंदे नाराज; वादग्रस्त नेत्यांचे कान टोचणार?

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आक्षेपार्ह विधान केलं. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  प्रचंड नाराज झाले असून ते आपल्या गटातील मंत्री तसेच नेत्यांची कानउघडणी करणार असल्याची माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे गटाचं एकदिवसीय शिबिर होणार आहे. या शिबिरात शिंदे गटातील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shrikant Shinde Property: अय्यो! फक्त ३ लाख कॅश, ५ वर्षात १० कोटींची वाढ.. CM शिंदेंच्या लेकाची संपत्ती किती?

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज वैध

Pune News: पुणेकरांच्या सुरक्षेसाठी चिमुकली उतरली रस्त्यावर! हृदयस्पर्शी संदेशातून करतेय हेल्मेट वापरण्याचं आवाहन; सुंदर VIDEO

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

SCROLL FOR NEXT