Eknath Shinde Group Leader Altaf Pevekar Attacked by Unknown Persons in Versova Saam TV
मुंबई/पुणे

Altaf Pevekar Attacks: शिंदे गटाच्या विभाग प्रमुखावर अज्ञातांकडून हल्ला; हल्लेखोर तोंडाला रूमाल बांधून आले अन्...

Altaf Pevekar Attacks News: शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Satish Daud

Altaf Pevekar Attacks News: शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हा हल्ला झाला असल्याचे समजते.  (Latest Marathi News)

अल्ताफ पेवकर वर्सोवा येथून आपल्या कारने घरी निघाले असता, हल्लेखोर तोंडाला रूमाल बांधून आले आणि त्यांनी अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी बॅटच्या सहाय्याने अल्ताफ पेवकर यांच्या कारची काच फोडली. तसेच त्यांना मारहाण देखील केल्याची माहिती आहे.

या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप अल्ताफ पेवकर यांनी केला आहे. दरम्यान, अल्ताफ पेवकर यांच्यावर हल्ला झाल्याचं कळताच शिंदे गटाच्या कार्यकर्ते वर्सोवा पोलीस ठाण्याबाहेर जमले होते.

आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करत त्यांना अटक करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होतं.

याबाबत मिळालेली माहिती अशी, शिवसेना शिंदे गटाचे (Eknath Shinde) अंधेरी आणि वर्सोवा विधानसभा क्षेत्राचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आपल्या कारने घरी जाण्यासाठी निघाले होते.

अंधेरी पश्चिमेकडील मॉडेल टाउन परिसरात त्यांची कार आली असता, अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी हातात असलेल्या बॅट आणि हॉकीस्टिकने अल्ताफ यांच्या कारची काच फोडली. हल्लेखोरांनी तोंडाला रूमाल बांधला असल्याने त्यांना ओळखता आलं नाही.

दरम्यान, अज्ञातांकडून हा हल्ला झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते रात्री उशिरा वर्सोवा पोलीस ठाण्याबाहेर देखील जमले होते. मात्र, हा हल्ला कोणी केला? राजकीय वर्चस्व वादातून हा हल्ला झाला का? याबाबत सध्या पोलीस तपास करत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी आईनं १० हजारांना मूल विकलं? नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा आरोप

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

Best Indian Patriotic Movies: या विकेंडला बघा देशभक्ती जागवणारे हे ७ चित्रपट

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

SCROLL FOR NEXT