Eknath shinde and aaditya thackeray  saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : CM शिंदेंवरील वक्तव्यानंतर शिंदे गट आक्रमक; डोंबिवलीत आदित्य ठाकरेंच्या प्रतिमेला जोडे मारले

Maharashtra Politics :जळगावनंतर आता डोंबिवलीतही शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली. डोंबिवलीत शिंदे गटाच्या युवा सेनेने आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केलं आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिंदे गटाची युवासेना आक्रमक भूमिका घेतली आहे. जळगावनंतर आता डोंबिवलीतही शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली. डोंबिवलीत शिंदे गटाच्या युवा सेनेने आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना युवासेनेने आदित्य ठाकरेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. डोंबिवली शहर शाखेबाहेर युवा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केले. दूधाच्या बाटलीच्या झाकणाने प्रतिकात्मक सत्तेचे दूध पाजत आंदोलन केलं.

या आंदोलनादरम्यान आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे जनतेत जाऊन दिवसरात्र काम करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता समस्त शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाठीमागे उभे आहेत. आदित्य ठाकरे यांनी जर पुन्हा गैरवर्तन केलं, तर त्यांना उत्तर देण्यास युवा सेना आणि शिवसेना सज्ज असेल, असा इशारा देखील देण्यात आला.

जळगावमध्ये आदित्य ठाकरेंचा पुतळा जाळला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यानंतर जळगावमध्ये आदित्य ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळला. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या या परिसरात तणावपूर्व शांतता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT