Eknath Shinde  Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde : शिंदे गटातील आमदार-खासदारांच्या सुरक्षेत वाढ; अमृता फडणवीसांनाही वाय दर्जाची सुरक्षा

एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आणि खासदारांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्या गटातील आमदार आणि खासदारांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. शिंदे गटातील १० खासदार आणि ४१ आमदारांना आता वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याही सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

महत्त्वाचं म्हणजे, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, सतेज पाटील, संजय राऊत, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, यांच्या नावांचा समावेश होता.

त्याचबरोबर नवाब मलिक, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, सुनील केदार, खासदार डेलकर परिवार, वरुण सरदेसाई. यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली होती. यामधून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांना वगळण्यात आलं होतं.

अमृता फडणवीसांच्याही सुरक्षेत वाढ

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली जाणारी झेड प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा तेजस आणि एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाय प्लस सुरक्षेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, यापुढे एक्स दर्जाची सुरक्षा मिळणार आहे. याआधी त्यांना वाय प्लस सुरक्षा दिली जात होती.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT