Eknath Shinde, Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! शिंदे सरकारचा अजित पवारांना दणका; 'त्या' कामांना दिली स्थगिती

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई : राज्यात नव्यानं सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारनं विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना पुन्हा एक दणका दिला आहे. शिंदे सरकारनं 941 कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती दिली आहे. यापैकी एकट्या बारामती नगरपरिषदेला 245 कोटींचे वितरण झाले होते. ही कामे मार्च 2022 ते जून 2022 या कालावधीत मंजूर करण्यात आली होती. (Eknath Shinde Latest News)

विशेष बाब म्हणजे शिंदे सरकारने फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती दिली आहे. तर शिवसेना आमदारांनी सूचवलेल्या कामांना मात्र अभय देण्यात आलं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी दिला जात नसल्याची शिवसेना आमदारांची तक्रार होती. त्यामुळे सत्ता बदल झाल्यानंतर कामांना स्थगिती देण्यात आल्याची चर्चा आहे.

दरम्यान, याआधी सुद्धा शिंदे सरकारनं महाविकास आघाडीला दणका दिला होता. 2022-23 या आर्थिक वर्षामधील जिल्हा विकास प्रकल्पांअंतर्गत देण्यात येणारा निधी रोखण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला होता. तब्बल 13 हजार 340 कोटींचा हा निधी होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या विभागासाठी हा निधी मंजूर केला होता. पण, नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत हा निधी दिला जाणार नाही, असं शिंदे सरकारने स्पष्ट केलं होतं. (Ajit Pawar Latest News)

शिंदे-ठाकरे एकत्र येणार?

दुसरीकडे शिवसेनेच्या महिला नेत्या दीपाली सय्यद यांनी एक सूचक ट्विट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच चर्चा करायला एकत्र येणार हे समजले असे दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. दीपाली सय्यद यांच्या ट्विटमुळे राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार का?, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : अरबाज-निक्कीच्या जोडीने पुन्हा मारली बाजी; प्रतिस्पर्धी सलग दुसऱ्यांदा बॅकफुटवर; नेमकं काय घडलं?

Nashik News : नाशिकमध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी; आजपासून १५ दिवस मनाई आदेश, काय आहे कारण?

Vivo V40e चा धमाका; लॉन्चच्या आधीच किंमत आणि फीचर्सबाबत मोठी अपडेट आली समोर

Viral Video : भरवर्गात विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका आली धावत; पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

Mumbai News: धक्कादायक! वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी मारुन कॅब चालकाची आत्महत्या; कारण काय?

SCROLL FOR NEXT