मुंबई/पुणे

Eknath Shinde : शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, एकनाथ शिंदेची निवडणूक आयोगाकडे मागणी

ठाकरे गट जाणून बुजून वेळ काढत असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यता आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे आपलं म्हणणं मांडण्याची मुदत 7 ऑक्टोबरला म्हणजे उद्या संपत आहे. त्याआधी शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अशी मागणी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात शिंदे गटाने हा दावा केला आहे. तत्काळ सुनावणी घ्यावी अशी विनंतीही शिंदे गटाने निवडणूक आयोगाला केली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकही कागदपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे ठाकरे गट जाणून बुजून वेळ काढत असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यता आला आहे.

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याबाबतची निवडणूक आयोगासमोर होणारी सुनावणी उद्या होणार नसल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणूकीसाठी उद्यापासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारवाईकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे गट सातत्याने आम्हीच शिवसेना असून आमच्या बाजूने विधीमंडळ पक्षातील एकूण सदस्यापैकी दोन तृतीयांश सदस्य आपल्या सोबत असल्याचं सांगत आहे. त्यामुळे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावं असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Raid On Lodge: लॉजमधील एका रुममध्ये २० मुलं-मुली; पोलिसांच्या धाडीनंतर उघडकीस आला खोलीतील भयानक प्रकार

Cricket Rules:क्रिकेटच्या नियमात मोठे बदल; BCCI कोणते नवीन नियम लागू करणार?

बॉलीवूडच्या भाईजानला झालंय काय?भाईजानच्या नव्या लूकमुळे चाहत्यांना चिंता, सलमान आजारी की प्रमोशन फंडा?

Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

एक राजीनामा घेऊ शकत नाहीत, नरेंद्र मोदी सर्वाधिक तरुणविरोधी पंतप्रधान; राहुल गांधींची घणाघाती टीका

SCROLL FOR NEXT