Eknath Shinde Devendra Fadnavis Oath-taking ceremony Saam TV
मुंबई/पुणे

CM of Maharashtra : …मग तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली?; शिवसेनेचा भाजपला थेट सवाल

शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून भाजपला अनेक सवाल विचारण्यात आले.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याला गुरूवारी अखेर पूर्णविराम मिळाला. बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे यांच्यासह यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान, शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून 2019 साली ठरलेल्या कथित अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याची आठवण फडणवीसांना करुन देण्यात आली. तसेच अटलीबिहारी वाजपेयींपासूनचे संदर्भ देत सत्ता मिळ्यानंतर आता पुढे काय? असा प्रश्न शिवसेनेनं भाजपाला विचारला आहे. (BJP vs Shivsena Latest News)

"महाराष्ट्रातील राजकारणात एक सोनेरी पान लिहिले गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एका क्षणात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनाही काही काळ थांबून लोकशाहीच्या विजयासाठी आकडय़ांचा खेळ करता आला असता. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गोंधळ निर्माण करून काही आमदारांचे निलंबन घडवून ते सरकार वाचवू शकले असते, पण त्यांनी तो मार्ग निवडला नाही व आपल्या शालीन स्वभावाला साजेशी भूमिका घेतली. ‘वर्षा’ बंगला तर त्यांनी आधीच सोडला होता. बंगला आपल्याकडेच राहावा म्हणून त्यांनी मिर्ची हवन वगैरे करण्याच्या भानगडी केल्या नाहीत. त्यांनी सामान आवरले व ‘मातोश्री’वर पोहोचले. आता मुख्यमंत्रीपद व विधान परिषदेची आमदारकीही त्यागली". असं म्हणत शिवसेनेनं विरोधकांना टोला लगावला.

अटलबिहारी वाजपेयी यांचा संदर्भ

“पक्षांतर करणाऱ्या, पक्षादेश मोडणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल लागेपर्यंत सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगणे घटनाबाह्य आहे, पण घटनेचे रखवालदारच अशी बेकायदा कृत्ये करू लागतात व ‘रामशास्त्री’ म्हणवून घेणारे न्यायाची तागडी झुकवू लागतात तेव्हा कोणाकडे अपेक्षेने पाहायचे? या सर्व पार्श्वभूमीवर अटलबिहारी वाजपेयी यांनी दोन महत्त्वाची विधाने केलेली आठवतात. अटलजींचे सरकार फक्त एका मताने कोसळत असतानाही अटलबिहारी विचलित झाले नाहीत. ‘‘तोडफोड करून मिळालेल्या बहुमतास मी चिमट्यानेही शिवणार नाही,’’ असे ते म्हणालेच, पण त्यांनी पुढे जे सांगितले त्याची नोंद आजच्या भाजपा नेत्यांनी घेणे गरजेचे आहे. ते लोकसभेच्या सभागृहात म्हणाले, ‘‘मंडी सजी हुई थी, माल भी बिकने के लिए तैयार था, लेकिन हमने माल खरीदना पसंद नहीं किया था!’’ अटलजींचा हा वारसा आता संपला आहे,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. (Eknath Shinde News)

...मग तेव्हायुती का तोडली?

“महाराष्ट्रात गुरुवारी जे घडले त्यावरून सत्ता हेच सर्वस्व आणि बाकी सगळे झूठ यावरच शिक्कामोर्तब झाले. सत्तेसाठी आम्ही शिवसेनेशी दगाबाजी केली नाही, असे सांगणाऱ्यांनीच मुख्यमंत्रीपदाचा मुकुट स्वतःवर चढवून घेतला. तोदेखील कोणाच्या पाठिंब्यावर, तर या सर्व बंडाशी आमचा काही संबंध नाही असा भाव जे साळसूदपणे आणत होते, त्यांच्या पाठिंब्यावर. म्हणजे शिवसेनेविषयीची नाराजी वगैरे हा सगळा बनाव होता. आम्हाला आश्चर्य वाटते ते देवेंद्र फडणवीस यांचे. त्यांना पुन्हा यायचे होते मुख्यमंत्री म्हणून, पण झाले उपमुख्यमंत्री. दुसरे असे की, हाच म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचे हा फॉर्म्युला निवडणुकीपूर्वी दोघांनी ठरवला होता. मग तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली?,” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.

देशात लोकशाही कशी जिवंत राहणार?

“विरोधकांना मिळेल त्या मार्गाने त्रास नव्हे, तर छळ करण्याचे तंत्र उदयास आले आहे. योगी श्री अरविंद एकदा म्हणाले होते, ‘‘राजसत्तेच्या हाती अधिकाधिक अधिकार सोपविण्याची प्रवृत्ती सध्या इतकी बळावली आहे की, त्यामुळे व्यक्तीच्या स्वतंत्र आणि स्वयंस्फूर्त प्रयत्नांना वावच मिळत नाही आणि जरी तो मिळाला तरी तो इतका अपुरा असतो की, शेवटी सत्तायंत्रणेपुढे व्यक्ती असहाय्य होऊन जाते!’’ आज विरोधी बोलणाऱ्या व्यक्तींना याच पाशवी तंत्राचा वापर करून दाबले जात आहे. जगभरात लोकशाहीचा डंका वाजवत फिरायचे आणि आपल्याच लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्याच्या दिव्याखाली अंधार, अशी सध्याची स्थिती आहे. विरोधी पक्षाचे अस्तित्व संपवून या देशात लोकशाही कशी जिवंत राहणार?,” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे. (Devendra Fadnavis News)

शिवसेनेलाही भाजपचा मास्टरस्ट्रोक मान्य?

रंगतदार राजकीय घडामोडींत अखेर सरकार आता स्थापन झाला. मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी शपथ घेतल. पण उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेण्याआधी नाट्यमय घडामोडी घडल्या. मी मंत्रिमंडळात नसेल, असं शिंदे यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद घेण्यास सांगतलं. त्यानंतर अमित शाह यांचेही फडणवीसांच्या अभिनंदनाचं ट्वीट आलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दोनवेळी फोन केल्याची माहिती देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Season: थंडीच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

Anupam Kher: वयाच संबंध नाही! या व्यक्तीनं चालवली सर्वात छोटी सायकल, अनुपम खेर यांनी पोस्ट केला व्हिडीओ

Maharashtra News Live Updates: देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई - संजय राऊत

Health Tips: महिलांनी 'या' समस्येत अननसाचे सेवन करणे टाळावे

Jalgaon News: जळगावात सोन्याची गाडी पकडली, ५ कोटींचं घबाड जप्त

SCROLL FOR NEXT