देवेंद्र फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रिपदावर शरद पवारांची टोलेबाजी, म्हणाले...

शिंदे हे मूळचे सातारचे माझं गाव सातारा जिल्ह्यात आहे. शिवाय बाबासाहेब भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण सगळे सातारा जिल्ह्यातील त्यामुळे सातारा जिल्ह्याला लॉटरी लागली.
Maharashtra Political News Updates Sharad Pawar Devendra Fadnavis
Maharashtra Political News Updates Sharad Pawar Devendra FadnavisSaam TV

सचिन जाधव -

मुंबई: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज शपथ घेतली. या शपथविधीनंतर राज्यातील विविध नेत्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान, राज्यातील यासर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांना टोला लगावला, फडणवीसांनी आनंदाने उपमुख्यमंत्री पद स्वीकारली असं वाटत नाही असं पवार म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलताना पवार (Sharad Pawar) म्हणाले, एकनाथ शिंदे हे मूळचे सातारचे आहेत. माझं गाव सातारा जिल्ह्यात आहे. शिवाय बाबासाहेब भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण सगळे सातारा जिल्ह्यातील त्यामुळे सातारा (Satara) जिल्ह्याला लॉटरी लागली. मी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर बोललो त्यांना शुभेच्छा दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो राज्याचा होतो त्यांनी काम करावं असं सागितलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्याचं पवार म्हणाले.

पाहा व्हिडीओ -

महाविकास आघाडी कमी पडली नाही, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना आमदारांना घेऊन जाण्यात शिंदे प्रभावी ठरले, हे सोपं नाही त्यांनी त्यांची कुवत दाखवली. माझं उद्धव ठाकरे यांचे काय बोलणं झालं हे माध्यमासमोर बोलणार नाही. फडणवीस यांनी आनंदाने उपमुख्यमंत्री पद स्वीकारली असं वाटत नाही. आदेश पाळायच असतो भाजपमध्ये तो फडणवीस यांनी पाळला असा टोला देखील त्यांनी फडणवीसांना लगावला.

दरम्यान, काँग्रेस राष्ट्रवादीचं नाव घेतलं जातंय यात काही तथ्य नाही. उद्धव ठाकरे यांनी बहुमत गेल्यावर राजीनामा दिला. सत्तेला चिकटून राहिले नाहीत हे माझ्या दृष्टीनं चांगलं. माझ्या मते शिवसेना संपुष्टात आली नाही, येणार नाही. या अगोदर शिवसेनेत अनेक बंड झाले. अनेक जण गेले छगन भुजबळ, नारायण राणे गेले शिवसेनेत हे पहिल बंड झालं नाही त्यामुळे संघटना संपत नसते.

माझ्या बाबतीत असं घडलं ६७ लोकांचा नेता होतो ५ लोकांचा नेता झालो. परत लढलो आणि सीट वाढवल्या असही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, मंत्रीमंडळ प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडल्यानंतर संयुक्त आघाडीमध्ये वाद आहेत असा मेसेज जाऊ नये, म्हणून सर्वमताने नामांतर विषय मंजूर केला असल्याचं स्पष्टीकरणही पवारांनी दिलं.

शिवाय ईडीमध्ये अनेक विधानसभा सदस्यांची चौकशी सुरू आहे. आता ईडी खेडोपाडी बोलतात अनेक ठिकाणी ईडीचा वापर आता केला जात आहे असं म्हणत त्यांनी ईडीवर टीका केली. तसंच यावळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केलं, 'कुठल्या निर्णयात दिल्लीहून सूचना येतायत का नाही या खोलात जायच काम नाही. एकच सांगतो उपमुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या मनाने घेतलं असं वाटत नाही असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला.

तसंच एकनाथ शिंदेचे नाव मुख्यमंत्रीपदी घेतल्यावर धक्का बसला तर उपमुख्यमंत्र्यांचे नाव ऐकून देखील धक्का बसला कदाचित हे धक्कातंत्र द्यायच ठरलं होतं असंही पवार म्हणाले. तर शिंदे सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता आहे. मनसुद्धा जुळली जातील शिवसैनिकांची मनही जुळतील, हे सगळं करत असताना एखादा शब्द वाईट गेला असला तर दिलगिरी असंही पवार म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com