Eknath Shinde and 16 Mla Disqualification Updates Rahul Narvekar preparing to take a big decision  Saam Tv
मुंबई/पुणे

Shivsena Crisis: १६ आमदार अपात्र प्रकरणात मोठी अपडेट; विधानसभा अध्यक्ष मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Shivsena MLA Disqualification: राहुल नार्वेकर पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गटाला नोटीस बजावणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

Satish Daud

Shivsena MLA Disqualification News: शिवसेनेतील फुटीनंतर १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपावण्यात आलं आहे. या प्रकरणाचा निकाल तातडीने द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून वारंवार केली जात आहे. अशातच राहुल नार्वेकर पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गटाला नोटीस बजावणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. (Latest Marathi News)

खरी शिवसेना कुणाची? (Shivsena) हे तपासण्यासाठी प्रक्रियेचा एक भाग म्हणून राहुल नार्वेकर लवकरच दोन्ही गटांना नोटीस बजावणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे १६ आमदार अपात्र प्रकरणाला आता वेग आला असून यावर नेमका काय निर्णय होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

शिवसेना फुटीनंतरचा वाद सुप्रीम कोर्टात गेला होता. प्रदीर्घ सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी तब्बल ६ हजार पानी उत्तर पाठवले आहे. हा शिंदे गटाच्या आमदारांनी केलेला वेळकाढूपणा आहे, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या उत्तरातील ठळक मुद्दे काढण्यास विधिमंडळाकडून सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेना आमदारांच्या उत्तरात कायदेशीर बाजू मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आम्हीच शिवसेना हे पटवून देण्याचा शिंदे गटाच्या आमदारांचा प्रयत्न आहे.

शिंदे गटाकडून या लेखी उत्तरात काही पुरावे सादर करण्यात आले आहेत. उर्वरित पुरावे प्रत्यक्ष सुनावणीवेळी सादर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणात आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पुन्हा एकदा दोन्ही गटांना नोटीस बजावणार असल्याचं कळतंय. त्यामुळे या प्रकरणाता आता पुढे काय होणार? याकडेचं सर्वांचं लक्ष लागून आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

Shriya Pilgaonkar: 'आम्हाला तुझा विशेष अभिमान...' सचिन पिळगावकरची लेकीसाठी खास पोस्ट

Akshay Kumar : मुंबईतील दोन घरं विकली; अक्षय कुमार झाला मालामाल, नफा वाचून बसेल धक्का

Maharashtra Live News Update : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण, आज पुन्हा होणार सुनावणी

Pune Rave Party: ड्रग्ज घेतलं नाहीत, गुन्हा नाही, मग जावई पहिल्या क्रमांकाचा आरोपी कसा? खडसे पोलिसांवर संतापले

SCROLL FOR NEXT