Eknath Khadses Son-in-Law Caught in Rave Party Saam Tv News
मुंबई/पुणे

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Eknath Khadses Son-in-Law Caught in Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात खडसेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Bhagyashree Kamble

माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वाद चिघळलेला असतानाच आता आणखी एक खळबळजनक बाब समोर आली आहे. खडसेंचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना एका रेव्ह पार्टीत पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. ही पार्टी पुण्यातील खराडी येथील उच्चभ्रू भागातील एका महागड्या फ्लॅटमध्ये सुरू होती. पोलिसांनी या रेव्ह पार्टीवर छापा टाकत ७ जणांना ताब्यात घेतले आहे. या रेव्ह पार्टीत हुक्का, कोकेन आणि गांजा अशा अंमली पदार्थांचं सेवन केलं जात असल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकणावर आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, 'यासंदर्भातील माहिती मला पहिल्यांदा मिळत आहे. हे होणारच होतं, हे मला आधीपासून माहित होतं. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे', असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

दरम्यान त्यांना 'या प्रकरणात राजकीय वास येत आहे का?', असा प्रश्न विचारले असता, त्यांनी नाकारता येत नाही, असं उत्तर दिलं. त्यामुळे यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. याप्रकरणी खडसे म्हणाले, 'या प्रकरणी स्थानिक पोलीस तपास करणार नाहीत. खरंतर त्यांच्यावर दबाव असू शकतो. जे दोषी असतील, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे', असं खडसे म्हणाले.

कारवाईसंदर्भात खडसे म्हणाले, 'मला यासंदर्भात अद्याप पूर्ण माहिती मिळालेली नाही. मी स्पष्ट बोलणाऱ्यांपैकी आहे, मला माहिती मिळाल्यानंतर बोलेन. गेल्या काही दिवसांपासून विरोधात बोलत आहेत, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी आता कुणाच्याही बाजूला राहणार नाही, यामध्ये षडयंत्र असल्यास समोर यायला हवं', असंही खडसे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे 88 व्या वर्षी निधन

Heart health new year resolutions: नव्या वर्षात हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचंय? हे ५ संकल्प नक्की करा

पार्टी ऑल नाईट! पुणेकरांचा 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहणार, वाचा

Virat Kohli : विराट कोहलीचा नवा विक्रम; सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची गेली नोकरी

SCROLL FOR NEXT