PCMC Police Saam TV
मुंबई/पुणे

पैशांची चणचण, शेजारच्याचं अपहरण; आठ वर्षांच्या मुलाची डोक्यात दगड घालून हत्या

लक्ष्‍मण बाबुराव देवासीचे वडील बाबूराम देवासी आणि आरोपी बपील अहमद रईस हे एकाच इमारती मध्ये राहायला असून, ते एकमेकांच्या ओळखीचे होते.

गोपाल मोटघरे

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात चिखली परिसरातील हरगुडे वस्तीत, रविवारी लक्ष्मण बाबूराम देवासी या आठ वर्षाच्या मुलाची डोक्यात दगड घालून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने निर्घृण हत्या केली होती. मात्र लक्ष्मण देवासी याची हत्या नेमकी कुणी केली आणि कुठल्या कारणासाठी केला हे स्पष्ट झालं नव्हतं. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (PCMC Police) गुंडा विरोधी पथकाने लक्ष्मण देवासीच्या मारेकऱ्यांना शोधून काढल आहे. एक लाख रुपयांच्या खंडणीसाठी बपिल अहमद रइस या आरोपीने लक्ष्मण बापूराम देवासी याचं अपहरण करून त्याचा खून केला होता. असं पोलीस तपासात उघडकीस आल आहे.

लक्ष्‍मण बाबुराव देवासीचे वडील बाबूराम देवासी आणि आरोपी बपील अहमद रईस हे एकाच इमारती मध्ये राहायला असून, ते एकमेकांच्या ओळखीचे होते. मात्र बपील अहमद रइस ह्याला आर्थिक चणचण जाणवल्याने, त्यांने लक्ष्मण बाबूराम देवासी या आठ वर्षाच्या मुलाचं अपहरण करून त्याच्या वडिलांकडे एक लाख रुपये खंडणी मागण्याचा कट रचला होता. मात्र लक्ष्मण देवासी जेव्हा बपील अहमद रईस ह्यांच्या तावडीत असताना, आरडाओरडा केल्याने बपील अहमद रईस ह्याने लक्ष्मण बाबूराम देवासी याचा डोक्यात दगड घालून खून केला आहे असं पोलीस तपासात निष्पन्न झाल आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fort : किल्ला, समुद्र अन् हजारो फ्लेमिंगो; मुंबईतील 'या' ठिकाणाचं सौंदर्य मन मोहून टाकतं!

Diabetes Diet: डायबिटीजच्या रुग्णांसाठी 'ही' भाजी ठरू शकते फायदेशीर; ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी नक्की खा

Maharashtra News Live Update: धुळे सोलापूर महामार्गवर पुन्हा मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला

सत्ताधारी पक्षातील नेत्याची भररस्त्यात हत्या; कार्यालयात जाताना सहा जणांच्या टोळीने घेरलं अन्...

विंचू आणि साप चावण्यात नेमका काय फरक? पावसाळ्यात या घटना का वाढतात, जाणून घ्या महत्त्वाची माहिती!

SCROLL FOR NEXT