शिक्षण, नोकरीसाठी विदेशात जाणाऱ्या व्‍यक्‍ती, ऑलिम्पिक खेळाडूंसाठी कोविड लसीकरण Saam Tv
मुंबई/पुणे

शिक्षण, नोकरीसाठी विदेशात जाणाऱ्या व्‍यक्‍ती, ऑलिम्पिक खेळाडूंसाठी कोविड लसीकरण

अतिरिक्‍त तीन दिवसांची ही सवलत दिनांक ३१ ऑगस्‍ट २०२१ पर्यंत लागू

सुमित सावंत

सुमित सावंत

मुंबई : शैक्षणिक कारणांसाठी, नोकरीसाठी विदेशात जाण्‍यास इच्‍छुक नागरिकांसह टोकियो ऑलिम्पिकमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी जाणाऱ्या खेळाडुुंना आता आठवड्यातील सोमवार ते शनिवार अश्‍या सहापैकी कोणत्‍याही दिवशी, महानगरपालिकेने नेमून दिलेल्‍या ७ समर्पित कोविड लसीकरण केंद्रावर लस घेता येईल. यापूूर्वी सोमवार ते बुुधवार असे तीन दिवस ही मुुभा होती. त्‍यामध्‍ये गुरुवार ते शनिवार अशी तीन दिवसांची सवलत वाढव‍िण्‍यात आली आहे. ही सवलत दिनांक ३१ ऑगस्‍ट २०२१ पर्यंत लागू राहणार आहे. Education, people going abroad for jobs covid vaccinations for Olympic athletes

बृहन्‍मुुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने मुुंबईत कस्‍तुुरबा रुग्‍णालय, परळ येथील केईएम रुग्‍णालय, अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालय, विलेपार्ले येथील डॉ. कूपर रुग्‍णालय, गोवंडी येथील महानगरपालिका शताब्‍दी रुग्‍णालय, घाटकोपरमधील राजावाडी रुग्‍णालय, दहिसर जम्‍बो कोविड सेंटर या सात ठिकाणी विदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरदार आणि ऑलिम्पिक खेळाडू यांच्‍यासाठी कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण सुुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.

शैक्षणिक कारणासाठी, नोकरीसाठी आंतरराष्‍ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरिकांनी किंवा टोकियो (जपान) मध्‍ये नियोजित ऑलिम्पिक क्रीडा स्‍पर्धांसाठी जाणाऱ्या खेळाडुंच्‍या लसीकरणामध्‍ये केंद्र सरकारच्‍या विविध निर्देशानुुसार सुुलभता आणली जात आहे. अशा नागरिकांनी कोविशिल्‍ड लसीचा पहिला डोस घेतल्‍यानंतर ८४ दिवस पूर्ण होण्‍यापूर्वीच, त्‍यांना विदेशात जाणे अत्‍यावश्‍यक असल्‍यास, पहिला डोस घेतल्‍यानंतर किमान २८ दिवसांचे अंतर पूर्ण झाले असल्‍यास त्‍यांना दुुसरा डोस मिळूू शकतो. तसेच संबंधित नागरिकाच्‍या लसीकरण प्रमाणपत्रावर आता त्‍यांचा पारपत्र (पासपोर्ट) चा क्रमांक देखील नोंदवला जातो. जागतिक आरोग्‍य संघटनेने कोविशिल्‍ड ही लस आपत्‍कालीन वापरासाठी मान्‍य केल्‍याने लस प्रमाणपत्रावर कोविशिल्‍ड या लसीचा उल्‍लेख आंतरराष्‍ट्रीय प्रवासासाठी पुरेसा आहे.

या सर्व सुुविधांसमवेत आता बृहन्‍मुुंबई महानगरपालिका प्रशासनाने गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे तीन दिवस देखील या गटातील नागरिकांच्‍या लसीकरणासाठी खुुले केल्‍याने त्‍यांना विदेशात जाण्‍यासाठी सुलभता होणार आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Liver disease: एड्सपेक्षाही धोकादायक आहे 'हा'लिव्हरचा आजार; 'साइलेंट किलर' समस्येची लक्षणंही वेळीच जाणून घ्या

Fraud Case : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ३०० कोटींची फसवणूक; शेकडो गुंतवणूकदार अडचणीत

Ankita Lokhande : नाकात नथ अन् कानात बुगडी; अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज, पाहा PHOTO

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT