अखेर शाळा सुरु होणार - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती (पहा व्हिडीओ) SaamTV
मुंबई/पुणे

अखेर शाळा सुरु होणार - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती (पहा व्हिडीओ)

ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी आणि शहरी भागातील 8 वी 12 वी पर्यंतची शाळा सुरू.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : टास्कफोर्स (Task Force) ने दिलेल्या सुचनांचे पालन करत येत्या 4 ऑक्टोंबर पासून शाळा सुरु करणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली आहे. 4 ऑक्टोंबरपासून टोस्क फोर्स ने दिलेल्या सुचनांचे पालन करत ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी आणि शहरी भागातील 8 वी 12 वी पर्यंतची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याच त्यांनी सांगितलं. (Education Minister Varsha Gaikwad informed that the school will start from October 4)

पहा व्हिडीओ -

शाळा सुरु केली असली तरी शाळांमधील खेळ (Sport) सुरू करणार नसल्याचही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. टास्कफोर्स ने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन केले जाणार असून शाळा सुरु करताना शिक्षकांनाही टास्क फार्स ने दिलेल्या सुचनांबाबतचे ट्रेनिंग (Teachers Traning) दिले जाणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांनी कशी काळजी घ्यावी याबाबत देखील नियमावली तयार करण्यात आली असल्याच त्यांनी सांगितलं. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दोन लस (Vaccine) घ्याव्या असंही SOP मध्ये असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, सुरक्षेची काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात येईल आणि यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ही सूचना दिल्या जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना घरात आल्यावर कपडे बदलणे, मास्क (Mask),याबाबत सूचना दिल्या जातील विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी असेल तर पालकांना आणि शिक्षकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येतील मुलांचे टेम्प्रेचर नेहमी तपासले जावे तसेच ज्या शाळा कोविड सेंटर म्हणून वापरल्या आहेत त्याठिकाणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशा सुचनांसह. शाळेत विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या सहमतीनेच उपस्थित करा असही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. पालकांची सहमती महत्वाची आहे.

दरम्यान, शाळा सुरु केल्या तरी जे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाहीत त्यांना ऑनलाईन शिक्षण (Online Education)घेता येईल असही यावेळी शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली शाळा अखेर सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आनंदाच वातावरन निर्माण झालं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT