ED raids JM Mhatre offices in Panvel forest land scam Saam
मुंबई/पुणे

Panvel land scam: पनवेलमध्ये २ ठिकाणी ईडीची छापेमारी, मोठं घबाड सापडणार का?

Panvel Forest Land Scam: पनवेलमधील वहाळ गावात बनावट सातबारा नोंदीद्वारे शासकीय वनजमीन विकल्याचा आरोप. ईडीकडून ४२ कोटींच्या व्यवहाराची चौकशी सुरू असून छापेमारी सुरू आहे.

Bhagyashree Kamble

पनवेल तालुक्यातील वहाळ गावातील शासकीय वनजमीन बळकावण्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने जे.एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक जे.एम. म्हात्रे यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर छापेमारी केली आहे. सक्तवसुली संचालनालयाने कारवाई करत सकाळपासूच छापेमारीला सुरूवात केली आहे.

वनविभागाच्या तक्रारीवरून कारवाई

उरण (अलिबाग विभाग) येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पनवेल पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 05/09/2024 दाखल करण्यात आला होता. या आधारे ED ने आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासासाठी ECIR नोंदवून चौकशी सुरू केली आहे.

वनजमीन बेकायदेशीरपणे मिळवून NHAI ला हस्तांतर

एफआयआरनुसार, वर्ष 2005मध्ये म्हात्रे यांच्याकडून बनावट सातबारा नोंदी करून वनजमीन बेकायदेशीरपणे मिळवण्यात आली. ही जमीन म्हणजे गट नंबर 427/1 (41.70 हेक्टर) आणि गट नंबर 436/1 (110.60 हेक्टर), मौजे वहाळ, तालुका पनवेल, जिल्हा रायगड अशी आहे.

या जमिनीतून गट क्रमांक 436/1 मधील 1.86 हेक्टर जमीन म्हात्रे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) विक्री केली आणि त्यासाठी त्यांना 42.40 कोटींचा मोबदला मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, सय्यद मोहम्मद अब्दुल हमीद कादरी यांनी गट क्रमांक 427/1 मधील 0.4225 हेक्टर जमीन NHAI ला हस्तांतरित केली आणि त्याबदल्यात 9.69 कोटी घेतले, असा आरोप एफआयआरमध्ये दाखल करण्यात आला आहे.

ईडीची छापेमारी तीन ठिकाणी सुरू

या घोटाळ्याशी संबंधित "प्रोसीड्स ऑफ क्राईम" म्हणजेच आर्थिक गैरव्यवहारातून मिळालेली मालमत्ता शोधण्यासाठी ईडीकडून पनवेलमधील दोन ठिकाणी आणि मुंबईतील दादर येथील एका ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे.

गुन्हेगारी कलमे आणि कायदेशीर कारवाई

या प्रकरणात संबंधित व्यक्तींवर भारतीय दंड संहिता, वन कायदा तसेच प्रतिबंधक आर्थिक व्यवहार कायदा (PMLA) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, ईडीने या आर्थिक घोटाळ्यातील साखळी उलगडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

पुढील तपास सुरू

प्राथमिक चौकशीतून हे प्रकरण केवळ मालमत्तेपुरते मर्यादित न राहता, राजकीय आणि प्रशासकीय साठेबाजांशी संबंध उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडीकडून या प्रकरणात सखोल तपास सुरु असून, पुढील काही दिवसांत आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

SCROLL FOR NEXT