ED Saam TV
मुंबई/पुणे

ईडी अधिकाऱ्यांची चौकशी होणार; मुंबई पोलिसांकडून SIT ची स्थापना

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईडी अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुबंई : ईडीचे (ED) काही अज्ञात अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यांच्या याच आरोपांवरुन त्या कथित अधिकाऱ्यांचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी SIT ची स्थापना केली आहे. याबाबतची माहीती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही ईडीचे अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या याच आरोपांबाबत तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून SIT ची स्थापना करण्यात आली असून या SIT चे नेतृत्व अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू करणार आहे.

काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊतांनी 'भाजप आणि ED अधिकाऱ्यांवर निशाणा साधत ईडीचे काही अधिकारी वसुली करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसंच राऊतांनी यावेळी जितेंद्र नवलानी यांच्यावरही आरोप केले होते. तेदेखील खंडणी वसुलीच्या प्रकरणात सहभागी असल्याचं ते म्हणाले होते.

दरम्यान, आता या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांची SIT स्थापण करणार असून अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करेल त्यांना तपासाठी जेवढा वेळ लागणार आहे तेवढा वेळ त्यांना देण्यात येईल अशी माहिती गृह मंत्र्यांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ढोल ताश्यांच्या गजरात करीरोडचा कैवारी गणपती विसर्जन मिरवणूक

Alibag Fort : अलिबागला गेल्यावर 'हा' ३०० वर्षे जुना समुद्री किल्ला पाहाच, ओहोटीच्या वेळी चक्क चालत जाता येतं

Liver disease symptoms: लिव्हर खराब होत असल्यास तुमच्या त्वचेवर दिसतात 4 लक्षणं; शरीरात दिसणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Oil Price : खाद्यतेलाच्या दरांबाबत केंद्राचा मोठा निर्णय; कंपन्यांना MRP कमी करण्याचे निर्देश

Onion Oil Vs Rosemary Oil: कांद्याचे तेल की रोझमेरी तेल, केसांच्या वाढीसाठी कोणते तेल फायदेशीर?

SCROLL FOR NEXT