Sanjay Raut  Saam Tv
मुंबई/पुणे

ईडी भाजपच्या ताटा खालचं मांजर नसेल, तर चौकशी सुरु होईल- राऊत

किरीट सोमय्या आणि त्यांचे म्हापुत्र याच्या एका भयंकर राष्ट्रद्रोही प्रकारच्या भ्रष्टाचार प्रकरण यांचा बाहेर काढला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी लोकांकडून जमा केलेला निधी किरीट सोमय्यांनी करण्यात केला आहे. देशासाठी बलिदान करणाऱ्यांचा असा अपमान करणाऱ्या किरीट सोमय्यांची वकिली करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना चार जोडे हाणले पाहिजे अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हे देखील पहा-

आयएनएस विक्रांतसाठी जमा केलेला निधी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी हडप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला आहे. राज्यपाल कार्यालयाकडून आलेल्या माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी हा आरोप केला आहे. यानंतर आता शिवसेना- भाजप राजकीय संघर्ष आता आणखी पेटण्याची शक्यता आहे.संजय राऊत यांनी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितले आहे की, सोमय्या यांनी देशासाठी बलिदान करणाऱ्यांच्या अपमान केला असून त्यांची कृती देशद्रोहीपणाची आहे. मात्र, देशभक्तीचे गीत गाणारे, देशभक्तीचा दाखला देणारे देवेंद्र फडणवीस यांनी देशद्रोहीपणा करणाऱ्यांची बाजू घेतली.

देवेंद्र फडणवीस यांच्या या पावित्र्याने स्वर्गीय गोळवलकर गुरुजी, देवरस, रज्जू भैय्या, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आत्मा तीळ तीळ तुटत असेल. मोहन भागवत यांनादेखील वाईट वाटत असेल असेही राऊत यांनी म्हटले. आयएनएस विक्रांतच्या या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे. आयएनएस विक्रांतसाठी देशभरातून पैसे जमा केले. आयएनएस विक्रांतसाठी 200 कोटी ठरवण्यात आले. त्याहून अधिक पैसे जमा झाले असल्याची माहिती असल्याचे राऊत यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

SCROLL FOR NEXT