मुंबई: राज्यसभेमध्ये स्थगन प्रस्तावाची मागणी शिवसेनेने केली असून विक्रांत आयएनएसमधील भ्रष्टाचारावर चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे, संजय राऊत यांनी आज परत एकदा माध्यमांसमोर येत किरीट सोमय्यांवर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलंय की, किरीट सोमय्या यांनी INS विक्रांतच्यासंदर्भात भ्रष्टाचार करुन देशभावनेचा, लोकभावनेचा आणि सैनिकांच्या बलिदानाशी खेळ केला आहे. तरी देखील त्यांचे समर्थन देवेंद्र फडणवीस समर्थन करतात हे पाहून गोळवलकर आणि हेडगेवारांचा जीव तीळ तीळ तुटला असणार आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. हा मनी लाँड्रींगचा प्रकार असून ईडी जर भाजपची बटीक असेल तर तिने PMLA हा कायदा लागू करावा. सोमय्या पितापुत्रांनी PMC बँकेच्या माध्यमातून हा पैसा व्हाईट करुन त्यांच्या उद्योगधंद्यात आणि निवडणुकीत वापरल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
हे देखील पहा-
संजय राऊत पुढे म्हणाले की, सैनिकांच्या बलिदानाचा बाजारात भाव करणारे भाजपचे महात्मा किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या भयंकर राष्ट्रद्रोही भ्रष्टाचाराचे प्रकरण मी काल बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, मला देवेंद्र फडणवीसांचे आश्चर्य वाटलं की ते दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती शिकवतात मात्र, त्यांनी काल राष्ट्रद्रोही सोमय्यांची बाजू घेतली. ते पाहून गोळवलकर, हेडगेवार देवरस, मोहन भागवतांचा जीव तीळ तीळ तुटला असणार आहे. खरं तर फडणवीसांनी सोमय्यांना चार जोडे मारायला हवे होते. पुढे ते म्हणाले की, ज्याने देशाची महान युद्धनौका लिलाव मांडला, त्याच्यातून लोकांना फसवून पैसे गोळा केलेत, त्याचे पुरावे समोर आले तरी म्हणता की पुरावे कुठायत? या देशासाठी तुमचं काय योगदान आहे? जे बलिदान आहे. त्या नावार तुम्ही पैसे गोळा केले. कधी राममंदिरासाठी कधी गंगाजल विकून पैसे गोळा करता... पुन्हा त्याची वकीली देखील करता...? राजभवनाने भ्रष्टाचाराचा पुरावा दिला आहे. शिवसेनेत राज्यसभेत लोकसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्रात या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केले जाईल. देशभक्तीचे आणि हिंदुत्वाचे खोटे मुखवटे लावून लोकांना मुर्ख बनवण्याचे काम सुरु आहे. भविष्यात आणखी विषय मांडणार आहे. आयएनएस विक्रांत जरी या लोकांनी भंगारात घालवली असेल तरी त्यांचे पक्ष अरबी समुद्रात बुडवल्याशिवाय शिवसेने गप्प बसणार नाही, असंही ते म्हणाले.
ते म्हणाले की, विक्रांत प्रकरणात पैसे देशभरात गोळा केलेत. मी फक्त महाराष्ट्रासंदर्भात बोलतो आहे. हे पैसे किरीट सोमय्यांनी आपल्या निवडणुकीमध्ये वापरलेत. पीएमसी बँकेच्या माध्यमातून व्हाईट करुन चलनामध्ये आणले आहेत. नील किरीट सोमय्यांच्या धंद्यामध्ये वापरले आहेत. सातशेच्या वर बॉक्सेस तयार केले आहेत. जवळच्या माणसाने दिलेल्या माहितीनुसार, 711 बॉक्सेस वापरण्यात आले. मुलुंडच्या कार्यालयात पैसे ठेवण्यात आले. पैशांचे बंडल वापरण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावलं. हा एक मनी लाँड्रीगचाही प्रकार आहे. या प्रकाराला PMLA कायदा लागू होऊ शकतो. जर ईडी भाजपची बटीक नसेल तर हा ईडीचा कायदा या प्रकाराला लागून कारवाई होऊ शकतो. काल मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यासंदर्भातील कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही.
Edited By- Diga
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.