Kishori Pednekar News  saam tv
मुंबई/पुणे

Kishori Pednekar: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा; ईडीकडून लवकरच होणार चौकशी?

Kishori Pednekar Latest News: मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Satish Daud

Kishori Pednekar Latest News: मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कारण, ईडीने कोविड-19 कथित बॉडी बॅग प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यासोबत माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

लवकरच ईडीकडून (ED) किशोरी पेडणेकर यांना चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यता आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर कोरोना संकटकाळात अधिक दरात बॉडी बॅग खरेदी करून घोटाळा केल्याचा आरोप आहे.

या घोटाळ्यामध्ये ४९ लाखांपेक्षाही अधिकची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडीने कथित घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. अनेक दिवसांच्या चौकशीनंतर आता ईडीने किशोर पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यासह माजी अतिरिक्त महापालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

मनी लॉड्रींगप्रकरणी पीएमएलए कायद्याअंतर्गत ईडीने हा गुन्हा दाखल केल्याचं सूत्रांनी साम टीव्हीला सांगितलं आहे. याआधी, ईडीने कोविड जंबो सेंटर घोटाळ्याप्रकरणी पीएमएलए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

जुलै महिन्यात ईडीकडून शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित मुकुंद पाटकर (४६) आणि नागरी डॉक्टर किशोर बिसुरे (५५) यांना अटकही करण्यात आली होती. आतापर्यंत या कथित घोटाळ्यासंदर्भात ईडीने नोंदवलेला हा दुसरा मनी लाँडरिंगचा गुन्हा आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी १८ जुलै रोजी कोविड महामारीच्या काळात खर्चात अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. यानंतर याप्रकरणात EOW चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

SCROLL FOR NEXT