ED  Saam Tv
मुंबई/पुणे

१७० कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडून पती-पत्नीवर गुन्हा दाखल

दोघांनीही गैरव्यवहारातील रकमेतून मालमत्ता खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सुरज सावंत

मुंबई - युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीत १७० कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडून (ED) पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशातील प्रसिद्ध विमा कंपनी 'युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी'त हे दोघं होते कामाला होते. दोघांनीही गैरव्यवहारातील रकमेतून मालमत्ता खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे.आरोपी कुशल सिंह(३९) व त्याची पत्नी नीलम सिंह अशी या दोघांची नावे आहेत.

हे देखील पहा -

दोघेही कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कामाला होते. कुशल हा कंपनीच्या चर्चगेट येथील कॉर्पोरेट शाखेत अकाउंट्स विभागात काम करत होता. २१ संशयीत व्यवहारांद्वारे ही रक्कम या खात्यांमध्ये जमा करण्यात आल्याचे विभागीय चौकशीत निष्पन्न झाले. आरोपींनी ७० खात्यांमधून १७० कोटी रुपये काढल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले होते.

फसवणुकीच्या पैशातून आरोपींनी उत्तर भारतात जमीन व मालमत्ता खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. कंपनीचे उपव्यवस्थापक जयदीप सिन्हा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला आहे. कंपनीच्या करंट अकाउंटमध्ये अनियमितता असल्याने विभागीय चौकशीत बाब उघडकीस आली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT