Pratap Sarnaik
Pratap Sarnaik Saam Tv
मुंबई/पुणे

Pratap Sarnaik: प्रताप सरनाईकांना ईडीचा दणका, ठाण्यातील दोन फ्लॅट आणि भुखंड जप्त

सुरज सावंत

मुंबई: ईडीने शिवसेना (Shivsena) नेते प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना पुन्हा एकदा दणका दिलाय. ईडीने मनी लाँड्रिगप्रकरणी सरनाईकांची ठाण्यातील मालमत्ता जप्त केलीये. त्यांचे दोन फ्लॅट आणि एक भुखंड जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे प्रताप सरनाईकांच्या मागे पुन्हा एकदा ईडीचं शुक्लकाष्ठ लागल्याचं चित्र आहे.

ईडीने (ED) ठाण्यातील शिवसेनेच्या प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचे दोन फ्लॅट आणि एक भुखंड मालमत्ता मनी लाँड्रिंगअंतर्गत जप्त केलीये. याची किंमत 11.35 कोटी असल्याची माहिती आहे. NSEL घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीये.

ईडीने 2013 च्या NSEL घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंग अंतर्गत ही कारवाई केलीये. यापूर्वीही ईडीने याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रताप सरनाईकांना अनेकदा समन्स बजावले होते.

आठवडाभरात ईडीने शिवसेनेला (Shivsena) हा दुसरा मोठा धक्का दिला आहे. दोन दिवसांपूर्वी ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली होती. त्यानंतर आज पुन्हा ईडीने मोठी कारवाई करत प्रताप सरनाईकांची मालमत्ता जप्त केलीये.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर गोंधळ

PM Modi Rally: काँग्रेस, आरक्षण आणि 26/11; अहमदनगरमध्ये PM मोदींची विरोधकांवर चौफेर फटकेबाजी

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी सूर्याचा मास्टरप्लान! IPL दरम्यान करतोय खास सराव; स्वत:च केला खुलासा

LokSabha Election: सांगोल्यात EVM जाळलं; एकजण पोलिसांच्या ताब्यात

Kushal Badrike : “सहप्रवासी बदलत राहतात, “प्रवास” मात्र कायम असतो...”; कुशल बद्रिके आयुष्याबद्दल खूप काही बोलून गेला, पोस्ट चर्चेत

SCROLL FOR NEXT