devendra Fadnavis And Uddhav thackeray  saam tv
मुंबई/पुणे

'फिक्स मॅच मी बघत नाही'; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. तसेच भाजपवर देखील निशाणा साधला. 'त्यांच्या पोटात तेच दुखतंय. त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे आहेत. जसं गांधी आणि काँग्रेस वेगळी करायची होती, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis News In Marathi )

या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. या मुलाखतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. 'फिक्स मॅच मी बघत नाही. मी लाईव्ह मॅच बघत असतो. जेव्हा पुढे काही होईल, तेव्हा मी त्यावर प्रतिक्रिया देईन,अशी जोरदार प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. तर काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टीबाबत बैठक घेतली आहे. अजित पवारांच्या सरकारपेक्षा अधिक चांगला निर्णय कसा करता येईल हे आम्ही पाहू'.

दरम्यान, अजित पवारांनी कालच्या पत्रकार परिषदेत संभाजी महाराजांच्या स्मारकाचा निधी शिंदे सरकारने रोखल्याचाही आरोप केला होता. त्या आरोपावर फडणवीस म्हणाले,'संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत कोणतीही स्थगिती नाही.अजित पवारांसारख्या नेत्यांनी तरी माहिती घेऊन बोललं पाहीजे'. पुढे फडणवीस म्हणाले, 'आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयाबाबत नाही, तर महाविकास आघाडीनं जे निर्णय घेतले, त्याचबरोबर आघाडी सरकारने शेवटच्या काही दिवसांत ४०० जीआर काढले आहेत. त्याबाबत समीक्षा करत आहोत. त्या माध्यमातून कोणालाही टार्गेट करण्याचा यात प्रयत्न नाही'.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती

Crime News: शिवरस्त्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दाखवली पिस्तूल; चक्क पोलिसांसमोरच धमकावलं| व्हिडिओ व्हायरल

मध्य रेल्वेच्या आणखी एका रेल्वे स्टेशनचे नाव बदलले; आता नवीन नाव काय?

Amla Murabba Recipe: थंडीत आवळा मुरंबा कसा बनवायचा?

Sakal Survey: महायुती सरकार ठरलं अव्वल! कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात पायाभूत सुविधांवर झालं सर्वाधिक काम?

SCROLL FOR NEXT