बाळासाहेबांमुळे जगात देशाची 'हिंदुराष्ट्र' म्हणून ओळख - संजय राऊत
बाळासाहेबांमुळे जगात देशाची 'हिंदुराष्ट्र' म्हणून ओळख - संजय राऊत Saam TV
मुंबई/पुणे

बाळासाहेबांमुळे जगात देशाची 'हिंदुराष्ट्र' म्हणून ओळख - संजय राऊत

सुरज सावंत

मुंबई : अखंड महाराष्ट्र, स्वाभिमानी, शक्तीमान अस्मिता हे बाळासाहेबांचं योगदान असून बाळासाहेब ठाकरे हाच महाराष्ट्राचा आत्मा आहे. महाराष्ट्राबाहेर आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही मराठी आहोत याचा आत्मविश्वास बाळासाहेबांनी दिला, देशात सांगतो, आम्ही हिंदू आहोत ही हिंदुत्वाची अस्मिता देखील बाळासाहेबांनी दिली. बाळासाहेबांनी जगाला देशाची हिंदू राष्ट्र म्हणून ओळख करुन दिली. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आजही अमर आहेत, ते आमच्यासोबत आहेत असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं ते आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरें यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवरती ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेची (Uddhav Thackeray) तब्येत उत्तम आहे. विरोधकांना त्यांच्या तब्येतीची अधिक चिंता वाटते, त्याविषयी ते नेहमी बोलत असतात, विरोधी नेत्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीची ती लक्षणं आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, राज्याचे प्रमुख म्हणून जनतेशी संवाद साधतील शिवसेनेच्या राजकारणाची पुढची दिशा देखील देतील आणि भूमिका मांडतील असही राऊत यांनी यावेळी सांगितलं.

हे देखील पहा -

दरम्यान भाजपच्या (BJP) नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली याबाबत बोलताना राऊत म्हणाले, विरोधकांचा वेळ जात नाहीये. पुढील ३ वर्ष त्यांचा हेच करायचं आहे. सरकारचं उत्तम चाललं आहे. अशाप्रकारच्या कामांमध्ये राज्यपाल भवनाला देखील शामील केलंय, करु द्या. माझ्या शुभेच्छा आहेत असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी भाजपाला लगावाला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Truck Accident At Rahud Ghat: मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात; बसचा टायर फुटून ६ जण दगावल्याची भीती

Nirav Modi News : नीरव मोदीची अमरावती जमीन, कर्जही उचलंल

Today's Marathi News Live : नाशिकमध्ये बसचा टायर फुटून भीषण अपघात; 5 ते ६ जण दगावल्याची शक्यता

Kolhapur News : अज्ञातांकडून मिरचीवर तणनाशक फवारणी; दीड एकर मिरचीचे नुकसान

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी आज BCCI ची बैठक! या १५ खेळाडूंना मिळू शकते संधी

SCROLL FOR NEXT