Flipkart Viral News Saam TV
मुंबई/पुणे

फ्लिपकार्टच्या एका चुकीमुळे ग्राहकाचं उघडलं नशीब; ऑर्डर केला आयफोन-13 अन् मिळाला...

Online कंपन्यांमधून दिवसाला कोट्यावधींची उलाढाल होते. तर लाखो ग्राहक रोज या कंपन्यांकडून विविध वस्तू ऑर्डर करत असतात. त्यामुळे या कंपन्यांच्या मॅनेजमेंटकडून काही चूका होण्याची शक्यता असते.

Jagdish Patil

Viral News: सध्या सुरु असणारा सणासुदीचा हंगाम आणि येऊ घातलेला देशातील सर्वात मोठा दिवाळी उत्सव यामुळे बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. प्रत्येक विक्रेता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर देत आहेतच. (Online Shopping)

मात्र, सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यामध्ये सर्वात आघाडीवरती आहेत ते म्हणजे ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्या (Online sales companies), कारण नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत या कंपन्यांनी ग्राहकांवरती ऑफर्सची खैरात केली आहे.

त्यामुळे ग्राहक देखील खरेदीसाठी ऑनलाईन कंपन्यांकडे झुंबड उडवत आहेत. या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने फ्लिपकार्ट (Flipkart), अॅमेझॉन, मिंत्रा, रिलाईन्स डिजीटल, यांचा समावेश आहे. या कंपन्यांमधून दिवसाला कोट्यावधींची उलाढाल होते. तर लाखो ग्राहक रोज या कंपन्यांकडून विविध वस्तू ऑर्डर करत असतात. त्यामुळे या कंपन्यांच्या मॅनेजमेंटकडून काही चूका होण्याची शक्यता असते.

या चुकांमध्ये कधी एका ग्राहकाची आर्डर दुसऱ्या ग्राहकाकडे जाण्याची शक्यता असते. तर बरेचदा, लोकांना त्यांनी ऑर्डर केलेल्या गॅझेटऐवजी विचित्र वस्तू मिळाल्याचा अनुभव देखील अनेकांना आला असेल. अनेकवेळा कंपनीच्या चुकीमुळे आपलं नुकसान होतं तर कधी आपला फायदा होतो. असाच एक प्रकार समोर आला यामध्ये एका ग्राहकाला आयफोन-13 (iPhone-13) ऐवजी आयफोन-14 मिळाला आहे.

त्यामुळे या ग्राहकाचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. याबद्दल अश्विन हेगडे यांनी आपल्या ट्विटद्वारे ही माहिती दिली असून, त्याने ट्विटमध्ये (Tweet) म्हटलं आहे की, माझ्या एका फॉलोअरने फ्लिपकार्टवरून आयफोन-13 ऑर्डर केला पण त्याऐवजी आयफोन-14 मिळाला. त्याने मोबाईल ऑर्डरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.

हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं असून अनेक जण मोबाईल मागविणाऱ्याने नशीब काढलं असं म्हणत आहेत. तर अनेक ट्विटर करत्यांनी ऍपल कंपनीला ट्रोल करत त्यांच्या आयफोन 13 आणि 14 मॉडेलमध्ये काही फरकच नाही त्यामुळे फ्लिपकार्टला 14 आणि 13 मधला फरक समजला नसल्यामुळे त्यांच्याकडून ही चूक झाली असेल असं लिहंल आहे.

तर काही ट्विटरकर्त्यांनी त्या ग्राहकाच्या नशीबाचे कौतुक केलं आहे. तर त्या व्यक्तीने प्रामाणिकपणे मिळालेला फोन परत करावा, असं आवाहन केलं आहे. मात्र, या प्रकारामुळे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडत असून नेटकऱ्यांच मनोरजंन होत आहे. तर त्या ग्राहकाला कमी पैशात चांगला मोबाईल मिळाल्याचं समाधान व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदीमध्ये कंपनीच्या चुकीमुळे कधी कधी ग्राहकांचा फायदा देखील होतो असाच काहीसा हा प्रकार समोर आला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT