Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Crime : पुण्यात वेश्या व्यवसाय आणि गांजा विक्री सर्रास सुरू, गुन्हेगारांना संरक्षण कवच कोणाचं?

Pune Crime News : पुणे शहरात वेश्या व्यवसाय, गांजा विक्री आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून पोलीस यंत्रणेवर संरक्षणाचे आरोप झाले आहेत. वाढती गुन्हेगारी लक्षात घेता प्रशासन मात्र गप्पच असल्याचं चित्र दिसत आहे. येरवडा आणि कल्याणी नगर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यात अवैध धंदे थांबता थांबत नाहीत

  • पोलिसांवर संरक्षणाचे गंभीर आरोप

  • अमलीपदार्थ, वेश्याव्यवसाय आणि भाईगिरी वाढतेय

  • नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण

सागर आव्हाड, पुणे

पुणे शहरांमध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत. पोलीस आयुक्तांनी आदेश देऊनही हे धंदे थांबता थांबत नाहीत. आठवड्यातील शनिवार रविवार हे धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असतात. स्पामध्ये वेश्या व्यवसाय, गांजा एमडी राजरोसपणे विकणे यामुळे शहरातील भाईगिरी वाढली असून कोयता घेऊन हल्ला करण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. मात्र या सगळ्या गुन्हेगारांना कोणाचं संरक्षण कवच आहे? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

येरवडा परिसरातील अमली पदार्थ, अवैध दारू, वेश्याव्यवसाय आणि गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून त्यांना पोलीस यंत्रणेतील काही मंडळींकडून छुपे संरक्षण मिळत असल्याचे धक्कादायक आरोप नागरिकांकडून समोर येत आहेत. लक्ष्मी नगर, यशवंत नगर, गाडीतळ रोड, कल्याणी नगर परिसरात खुलेपणाने गांजा विक्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका वयस्कर अपंग व्यक्तीकडून ५० ग्रॅम गांजा थेट २०० रुपयांत विकला जात असल्याचे दिसून येते. स्थानिक पोलिसांपेक्षा नार्कोटिक्स विभागाच्या कारवाया अधिक असल्याची तीव्र नाराजी लोकांमध्ये आहे. नार्कोटिक्स विभागाने अनेक ठिकाणहून विमल गुटखा प्रकरणात तब्बल २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

कल्याणी नगर परिसरात वेश्याव्यवसायाच्या नावाखाली चालणारे मसाज पार्लरदेखील खुलेआम सुरू असून, संबंधित अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप आहेत. पुणे पोलीस आयुक्तांकडून अवैध धंद्याविरोधात कारवाई केली जाते, असं बोललं जातं मात्र राजरोसपणे पुणे शहरातील अनेक भागात अवैध धंदे जोरात सुरू आहेत. त्यामुळेच भाईगिरी वाढली आहे. पोलीस आयुक्त इकडेही लक्ष द्या, असा नागरिकांनी म्हटलं आहे.

शहरातील चंदननगर, लोणीकंद, विमानतळ, खराडी, वाघोली, हडपसर, लोणी काळभोर, मुंडवा, येरवडा या भागात ऑनलाइन पद्धतीने वेश्याव्यवसाय सुरू आहे. शहरातील स्पा पूर्णपणे बंद होते. पुन्हा स्पा सुरू कसे झाले आणि कोणी केले. गुन्हे शाखा याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मोठ्या प्रमाणावर वसुलीही स्पा मधून केली जाते. शनिवार रविवार या भागात पार्ट्या मोठ्या प्रमाणावरती होतात. ऑनलाइन पद्धतीने एस्कॉर्ट शहरात सुरू आहे. याकडेही पुणे पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसते. पुण्यातील स्पा कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत. याबाबत कोणीही काही बोलत नाही. गुन्हे शाखेतील कर्मचारी नावापुरत्याच कारवाया करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय होऊन गळतायतं? मग पार्लर ट्रिंटमेंटपेक्षा घरीचं करा 'हा' हेअस मास्क, एका वॉशमध्येच दिसेल फरक

Maharashtra Nagar Palika Election Result Live : अकलूज नगरपरिषदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे २२ उमेदवार विजयी

Akola Election : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना मोठा हादरा; काँग्रेसने 65 वर्षांची सत्ता उलथवली

Daily Wear Silver Jewellery: ऑफिस किंवा कॉलेज वेअरसाठी ट्राय करा 'या' ट्रेंडी यूनिक सिल्व्हर ज्वेलरी

Nagaradhyaksha Winners List : तुमचा नगराध्यक्ष कोण? २८८ विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT