मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबईतील आर्थर रोड कारागृहातही ड्रग्जची तस्करी; हवालदारच कैद्यांना पुरवायचा ड्रग्ज

Arthur Road Jail constable: आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात पोलीस हवालदार कारागृहातील कैद्यांना ड्रग्ज पुरवत असल्याची घटना समोर आलीय.

Bharat Jadhav

Police Constable Smuggling Drugs:

पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहानंतर मुंबईतील आर्थर रोड कारागृह ड्रग्जमुळे चर्चेत आले आहे. या मध्यवर्ती कारागृहातील पोलीस हवालदारचं कैद्यांना ड्रग्ज पुरवत असल्याची घटना समोर आलीय. या प्रकरणी पोलीस हवालदाराला अटक करण्यात आलीये. विवेक नाईक असं या पोलीस हवालदाराचं नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक नाईक याला कारागृहात ७१ ग्रॅम चरसची तस्करी करताना पकडण्यात आलं. (Latest News)

या पोलीस हवालदाराविरोधात एन.एम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमान्वये या हवलदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या येरवडा कारागृहात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे वृत्त समोर आले होते. आता मुंबईतील आर्थर रोड कारागृहात देखील अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला. पोलीस हवालदार नाईक याला आर्थर रोड कारागृहाच्या चकिंग गेटवर पकडण्यात आलं.

ावेळी त्याने चरसच्या कॅप्सूल पॅक करून त्याच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवून ठेवल्या होत्या. त्याच्याकडून सुमारे ८ कॅप्सूल सापडले. आरोपी नाईकला हे ड्रग्ज राहुल नावाच्या कैद्याने दिले होते. नाईक हे कॅप्सूल अतिसुरक्षा सर्कल दोनमधील आरोपी राशीद याला द्यायचे होते. पण त्याचवेळी त्याला कारागृहातील पोलीस अधिकाऱ्यांनी पकडले आणि त्याला अटक केली.

ोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पकडल्यानंतर त्याने तपासणाऱ्या पोलीस हवालदाराच्या हाताचा चावा घेतला. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण मुख्य गेटवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. हवालदाराला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान आरोपी नाईक हा आर्थर रोड कारागृहातील अंडा सेलमध्ये एका कैद्याला ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोरंट पॉवरचे वृक्षतोड उबाठा शिवसेनेने पाडली बंद

Dalimb Benefits: रोज १ वाटी डाळिंब खा; हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

अंत्यसंस्कारावरून परतताना बस अन् ट्रकचा भीषण अपघात; 22 जणांचा मृत्यू, पाहा काळीज पिळवून टाकणारा VIDEO

किचनमध्ये कोणत्या दिशेला RO लावावं? दिशा चुकली तर होईल दुर्दशा

140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT