नेवाळी मधील बुडून मृत्यू झालेल्या शुभमचा व्हिडिओ व्हायरल Saam Tv
मुंबई/पुणे

नेवाळी मधील बुडून मृत्यू झालेल्या शुभमचा व्हिडिओ व्हायरल

शुभम भोईर याला होती क्रिकेट खेळाची आवड....

साम टिव्ही ब्युरो

कल्याण: गुरुवारी सायंकाळी नेवाळी (Nevali) मधील दोन तरुणांचा नेवाळी पाडा येथील गणेश घाटात बुडून मृत्यू झाला. नेवाळी मध्ये राहणारा शुभम भोईर याला क्रिकेटची प्रचंड आवड होती. त्याच्या मृत्यूनंतर गावावर चुकलेच वातावरण पसरले असताना त्याचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नेवाळी गावात राहणार शुभम भोईर आणि चांद पाटील हे दोन तरुण नेवाळी पाडा येथील गणेश घाटावर गुरुवारी पोहण्यासाठी गेले होते. मात्र सायंकाळ झाली तरी मुलं घरी आली नसल्याने कुटुंबियांनी शोध मोहीम सुरू केली. या नंतर या दोन्ही तरुणांचे मृतदेह गावकऱ्यांना दिसून आले.

गावकऱ्यांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले होते. मात्र त्याचा त्याआधीच मृत्यू झाला होता. या नंतर दोघांचे मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहेत. मात्र दोघांच्या अचानक जाण्याने गावावर मोठी शोककळा पसरली असून शुभम भोईर याचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकारी कर्मचाऱ्यांचे आरोपपत्राशिवाय ३ महिन्यांपेक्षा जास्त निलंबन नको; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Women's Reservation Bill: महिला आरक्षणासाठी केंद्र सरकारचा मोठा प्लॅन! लोकसभेच्या जागा ५४३ वरून थेट ८५० होणार? विशेष अधिवेशनात काय घडणार?

Pune Crime: पुण्यात किरकोळ कारणावरून वाद, तरुणाची भररस्त्यात हत्या; ८ जणांना जन्मठेप

Weather Update: थंडी गायब, पावसाचा धुमाकूळ सुरूच; १० ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज; ताशी ६० किमीच्या वेगाने वारे वाहणार

Friday Horoscope : शुक्रवारी ५ राशींचं नशीब चमकणार! कन्या राशीला घर-गाडीचा योग, 'या' राशींचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT