Mumbai News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: नोकराकडून मालकिणीला 52 लाखांचा गंडा; प्रकरण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल

पीडित महिलेने चारकोप पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक करणाऱ्या तिघां विरोधात तक्रार नोंदवली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> संजय गडदे

मुंबई : आपल्या टुरिस्ट कंपनीच्या गाडी चालवणाऱ्या चालकावर विश्वास ठेवणे मुंबईतील एक महिलेला चांगलेच महागात पडले आहे. गाडीत ड्रग्स आणि वापरलेले कंडोम सापडले असून गाडी वाहतूक पोलिसांनी जप्त केली आहे. कारवाई टाळण्यासाठी पोलिसांपासून न्यायाधीशांपर्यंत पैसे द्यावे लागतील असे सांगून महिलेला तब्बल 52 लाख रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चारकोप पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक करणाऱ्या तिघां विरोधात तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली चारकोप परिसरात राहणाऱ्या पीडित महिलेची टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे. टूर्स गाडी चालवणारे चालक सोहेल खानवर पीडितेने पूर्ण विश्वास ठेवला होता. नवऱ्याची कार्यालयीन बदली झाल्यामुळे पीडितेने ड्रायव्हर सोहेल खानवर विश्वास ठेवून सर्व जबाबदारी देत ती हरियाणा येथे राहण्यास गेली.गाडीचा संपूर्ण देखभाल चालक सोहेल खान करत होता. दरम्यान गाडीची दुरुस्ती किंवा इतर काही कामासाठी लागणारे पैसे पीडिता त्याला वेळोवेळी पाठवत असे व त्यांचे संभाषण हे मोबाईल वरून देखील होत असे.

28 नोव्हेंबर 2019 या दिवशी सोहेल खान याने गाडीमध्ये ड्रग्स आणि (स्पर्म) वापरलेले कंडोम गॅरेजवाल्याला आढळून आल्याचे पीडितेला फोन करून सांगितले. शिवाय गाडीची काही कागदपत्रे अपूर्ण असल्याचे देखील सांगितले व त्याने जहीर नावाच्या व्यक्तीची आरटीओ एजंट म्हणून ओळख करून दिली व त्याच्यासोबतही फोनवर बोलणे करून दिले. त्या कामी लागणारे सेहचाळीस हजार रुपये त्याच्या खात्यावर देखील पाठवले.

त्यानंतर पीडितेला फोन करुन कळवले की, गाडीची कागदपत्रके काढताना आरटीओ अधिकारी यांनी गाडीची पाहणी केली असून त्यामध्ये त्यांना ड्रग्स व स्पर्मचे अवशेष मिळाले असून गाडीच्या मालकावर आरटीओ अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. ते आता अटक करण्यासाठी येणार आहेत, असे आरोपीने फिर्यादी यांना सांगून घाबरवले.

मात्र तुम्ही घाबरू नका तुमच्यावरची केस मी माझ्या अंगावर घेतो यासाठी मी एक माफीनामा लिहून देखील द्यायला तयार आहे. मात्र यासाठी तुम्ही मला मी तुमच्या गाडीचा केअर टेकर असल्याचं स्टॅम्प पेपरवर लिहून द्या असे आरोपी चालक यांनी फिर्यादींना सांगितले. यानंतर फिर्यादींनी तसे कागदपत्र 23 फेब्रुवारी 2020 रोजी त्याला व्हाट्सअपवर पाठवले.

यानंतर कारवाई टाळण्यासाठी वांद्रे पोलीस वांद्रे न्यायालयातील वकील आणि जज यांना देण्याकरिता आरोपीने पीडितेकडे पैसे मागितले हे सर्व पैसे पीडीतेने झहीर (एजंट) याच्या खात्यावर पाठवले. सोहेल याने पोलीसांना माफीनामा दिल्यानंतर देखील पोलीसांनी त्याला एक आठवडा सोडले नाही व त्याला बेदम मारहाण केली असल्याचे झहीर याने मोबाईल फोनवरुन पीडितेला सांगितले.

यानंतर पीडितेने सोहेल याची सुटका करण्यासाठी झहीर पुन्हा पैसे दिले. सोहेल पोलीस कस्टडीत असताना पोलिसांनी त्याला खूप मारहाण केल्यामुळे त्याला उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल केले असून उपचारासाठी पुन्हा पैशाची मागणी केली. यावेळेस तुमच्यामुळेच माझ्या नवऱ्याला खूप मारहाण झाली असल्याचे सोहेल यांची पत्नी मेहेजबीन हिने पीडितेला फोनवर सांगितले. आता आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याने मदत करा, अशी विनंती देखील केली यानंतर पीडितेने अधिकचे पैसे दिले.

पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोहेलला जी दुखापत झाली होती त्याकरिता एका वकिलामार्फत त्यांनी मंत्रालय या ठिकाणी पोलीसांचे विरोधात तक्रार केली असून त्यांनी ती केस जिंकली आहे. मंत्रालयाकडून 34,00,000/- रुपये मिळणार आहेत. पैसे मिळणेकरता बांद्रयाचे एसीपी यांचे असिस्टंट रणवरे हे मदत करत असून त्यांना लाच म्हणून 2,00,000 रुपये द्यावयाचे आहेत असे सांगितले.

यानंतर पीडितेने सोहेल याच्या खात्यावर थोडे थोडे करुन 2,00,000 रुपये पाठवले.अशाप्रकारे वेगवेगळी कारणे सांगून पीडितेकडून आरोपीने 49,56,300 रुपये आणि त्यांची कार असे एकूण 52,16,300 रुपयाची फसवणूक व अपहार केला. म्हणून आरोपींविरोधात कायदेशीर तक्रार फिर्यादी यांनी नोंदवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulabrao Patil : लाडक्या बहिणींनी भावांना दिलेला आशीर्वाद; गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरूण‌ सरदेसाई आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

SCROLL FOR NEXT