DRDO - Pradeep Kurulkar saam tv
मुंबई/पुणे

DRDO Espionage Case: प्रदीप कुरुलकरसह अन्य एक अधिकारी हॅनी ट्रॅपमध्ये अडकला, ATS ने व्यक्त केला संशय

ATS News: प्रदीप कुरुलकर ज्या महिलेच्या संपर्कात होते त्याच महिलेच्या संपर्कात अन्य एक अधिकारी असल्याचे एटीएसच्या तपासातून समोर आले आहे.

Priya More

सुरज सावंत, मुंबई

Mumbai News: हनी ट्रॅपद्वारे (honeytrap) पाकिस्तानला (Pakistan) गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (ATS) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अटक केली आहे. सतध्या गुप्तचर यंत्रणेकडून (RAW) त्यांची चौकशी सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रदीप कुरुलकरसह अन्य एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा एटीएसला संशय आहे.

डीआरडीएचे संचालक प्रदीप कुरुलकर ज्या महिलेच्या संपर्कात होते त्याच महिलेच्या संपर्कात अन्य एक अधिकारी असल्याचे एटीएसच्या तपासातून समोर आले आहे. त्यामुळे हा अधिकारी देखील हनी ट्रॅप प्रकरणात अडकल्याचा संशय एटीएसला आहे. एटीएसने त्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे साक्षीदार म्हणून एटीएस पाहत आहे.

प्रदीप कुरुलकरच्या रिमांड सुनावणीदरम्यान एटीएसच्या अधिकाऱ्यांनी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याचा आयफोन जप्त केल्याचे न्यायालयाला सांगितले. एटीएसने न्यायालयात असे सांगितले की, 'जेव्हा ते डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्या कॉल आणि डेटा तपशीलांची छानणी करत होते तेव्हा त्यांना या गुप्तचर विभागात काम करणाऱ्या अन्य अधिकाऱ्याचा नंबर सापडला.'

'त्यानंतर या दुसऱ्या अधिकाऱ्याने महिलेसोबत कोणतीही गोपनीय माहिती शेअर केली आहे की नाही यावर एटीएसची पुढील कारवाई अवलंबून असेल.', असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. एटीएसला प्रदीप कुरुलकर प्रकरण आणि गुप्तचर अधिकाऱ्याच्या प्रकरणामध्ये काही संबंध असल्याचे सूचित करण्यासाठी अद्याप काहीही सापडलेले नाही. मात्र, कुरुळकर यांना हनी ट्रॅप करण्यासाठी वापरण्यात आलेला हाच क्रमांक गुप्तचर विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या बाबतीतही वापरण्यात आल्याचे त्यांना तपासात आढळून आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT