Dr Tatyarao Lahane On JJ Hospital Saam Tv
मुंबई/पुणे

Dr Tatyarao Lahane On JJ Hospital: गंभीर आरोपांवर डॉ. लहाने यांची स्पष्ट भूमिका; जेजे रुग्णालयाशी संबंध नाही म्हणत विषयच संपवला!

Resident Doctors Strike: जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्स विभागातील डॉक्टर, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Priya More

Mumbai News: जेजे रुग्णालयातील (JJ Hospital) नेत्रशल्यचिकित्स विभागातील डॉक्टर, प्राध्यापक आणि विभाग प्रमुखांनी तडकाफडकी राजीनामे दिल्यानंतर आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. जे. जे रुग्णालयाचा आणि आपला संबंध नसल्याचे सांगतात डॉ. तात्याराव लहाने (Dr Tatyarao Lahane)यांनी हा विषयच संपवला आहे. जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्स विभागातील डॉक्टर, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख विद्यार्थ्यांना त्रास देतात. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला होता. या आरोपानंतर निवासी डॉक्टरांनी संप (Resident doctors strike) पुकारला. आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळाले आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघात आजच्या राजीनामा दिलेल्या डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत घेतली. डॉ. तात्याराव लहाने, डॉ. प्रीतम सावंत, डॉ. शशी कपूर, डॉ. स्वरांजित सिंग, डॉ. सायली लहाने, डॉ. दीपक भट, डॉ. अश्विन बाफना यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी या सर्व डॉक्टरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या विभागाचे मानद प्राध्यापक डॉ. तात्याराव लहाने यांनी आमचा आणि जेजे रुग्णालयाशी संबंध नसल्याचे सांगत त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

डॉ. लहाने यांनी सांगितले की, 'एकतर्फी बाजू ऐकून घेत रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमची चौकशी करा अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. डॉ. सुमित लहाने हे एनएमसी गाईडलाईन्सनुसार रुग्णालयामध्ये येत होते. आम्हीच त्यांना बोलवून रुग्णसेवेसाठी शस्त्रक्रिया करा अशी मागणी केली होती. मात्र अधिष्ठात गुन्हा दाखल करण्यापर्यंत गेल्या. 'रुग्णसेवा देण्यासाठी जर तुरुंगात जावं लागलं तर जा' असं अधिष्ठाता यांनी सुमित लहाने यांना सांगितले होते.'

तसंच, 'कनिष्ठ निवासी डॉक्टर-3 च्या विद्यार्थ्यांना आम्ही शस्त्रक्रिया करायला शिकवले. दरवर्षी आमच्या विभागाकडे 70 ते 80 हजार रुग्ण येतात. जे.जे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभाग महाराष्ट्रातील सर्वात नावाजलेला विभाग आहे. आमची चौकशी करा अशी आम्ही मागणी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.', असा आरोप तात्याराव लहाने यांनी केला आहे.

दरम्यान, मुंबईतल्या जे जे रुग्णालयात वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक राजीनामे दिले होते. यामध्ये नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहान (Dr Tatyarao Lahane), डॉ. रागिणी पारेख (Dr. Ragini Parekh) यांच्यासह 9 वरिष्ठ डॉक्टरांचा समावेश आहे. डॉ. लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्यावर निवासी डॉक्टरांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याकडून दादागिरी केली जाते आणि शस्त्रक्रिया करू दिल्या जात नसल्याचे निवासी डॉक्टरांनी आरोप केले आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांना स्टायपंड मिळत नाही याशिवाय इतरही मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. जेजे रुग्णालयातील 750 निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter ID जवळ नाही, टेन्शन सोडा, तरीही मतदान करता येणार, ही १२ कागदपत्रेही आहेत ग्राह्य

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

SCROLL FOR NEXT