विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. सायंकाळी ५ वाजतचा प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. अशामध्ये मतदानापूर्वी पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुण्यातील हडपसरमध्ये मनसेला खिंडार पडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसरमधील अनेक मनसे पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेश केला. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा इंद्रायणी अजय न्हावले तसेच पुणे मनसे कामगार सेनेचे अजय भाऊ न्हावले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला.
हडपसर विधानसभा मतदारसंघामधून मनसेने साईनाथ बाबर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र विधानसभा निवडणूक मतदानाच्या २ दिवसांच्या आधी मनसेमधील अनेक पदाधिकारी यांनी हाती तुतारी घेतली. त्यामुळे साईनाथ बाबर यांच्यासह मनसेला मोठा धक्का बसला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाची पुण्यामध्ये ताकद आणखी वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.