Pune News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: डॉ.सदानंद मोरे आणि डॉ.राजा दीक्षित यांचे राजीनामे मागे; प्रशासकीय हस्तक्षेप दूर करण्याचे भाषा मंत्र्यांचे आश्वासन

डॉ.सदानंद मोरे आणि डॉ. राजा दीक्षित यांचे राजीनामे मागे.

Ruchika Jadhav

Pune News: राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे आणि विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी काल आपल्या पदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. कामकाजात होत असलेला प्रशासीय हस्तक्षेप यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. (Latest Pune News)

मिळालेल्या माहितीनुसार, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी डॉ.सदानंद मोरे आणि डॉ. राजा दीक्षित यांना होत असलेला प्रशासकीय हस्तक्षेप दूर केला जाईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या दोन्ही दिग्गजांनी आपला राजीनामा आता मागे घेतला आहे.

दोन्ही मंडळाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्यावर सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली. त्यामुळे मंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ पुणे गाठले. इथे त्यांनी डॉ.सदानंद मोरे आणि डॉ. राजा दीक्षित यांच्याशी डॉ.सदानंद मोरे यांच्या निवासस्थानी उपस्थीत राहून या विषयावर चर्चा केली. यावेळी प्रशासकीय हस्तक्षेप दूर होईल. तसेच दोन्ही मंडळांकडे त्यांचे स्वातंत्र्य कायम अबाधित राहिल. तुम्ही आम्हाला हवे आहात त्यामुळे कृपया तुमचे काम आहे तसे सुरू ठेवा, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.

राज्य शासन मराठी भाषा विभाग आयोजित ' मराठी तितुका मेळावा' या विश्व मराठी संमेलनात मराठी भाषे संदर्भात कोणत्याही चर्चेला प्राधान्य न देता करमणूक आणि जल्लोश, उत्सव अशा गोष्टींवर पैशांची उधळपट्टी केली जाते. ज्ञानमंडळे बराखस्त करणे या निर्णयाचा राग मनात ठेवून भाषा आणि वित्त विभागाने कामात अडवणूक केली, असे सांगत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे आणि विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी राजीनामा दिला होता. मात्र आता आमच्या सर्व अडचणी दूर केल्या जातील असे आश्वासन भाषा मंत्र्यांनी दिल्याने आम्ही राजीनामे मागे घेत आहेत, असे डॉ.सदानंद मोरे आणि डॉ. राजा दीक्षित यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा संपूर्ण वेळापत्रक

डेडलाईन संपण्याच्या काही मिनिटांआधी राहाता पालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाच्या उमेदवाराची माघार

Maharashtra Live News Update : भंडाऱ्याच्या तुमसरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि भाजपसमोर पक्षाच्या बंडखोरांचं आवाहन

Shocking: घरात साखरपुड्याची लगबग असतानाच भयंकर घडलं, नवरदेवासह आई-वडील आणि भावाचा मृत्यू

Diet Chivda Recipe: कुरकुरीत पोह्यांचा डाएट चिवडा कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT