Dr. Neelam gorhe
Dr. Neelam gorhe  Saam Tv
मुंबई/पुणे

पुणे मनपाने मनमानी कारभार थांबवावेत; नीलम गोऱ्हे यांची प्रशासनावर नाराजी

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पुणे शहरातील ऐतिसहासिक लाल महालात रिल्ससाठी लावणी नृत्य करणाऱ्या वैष्णवी पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांवर राज्यभरातून टीका होत आहे. त्यांच्यावर पुण्याच्या फरासखाना पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी पाटील आणि तिच्या साथीदारांना लाल महालातील मोकळ्या जागेत नृत्य करत शूटिंग करणं चांगलंच महागात पडलं आहे. या लाल महालातील नृत्य प्रकरणानंतर विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे मनपा प्रशासनाने लोकांना विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे आहे. स्वतःचे मनमानी कारभार थांबवा, अशा सूचना डॉ. निलम गोऱ्हे यांनी पुणे प्रशासनाला (Pune) दिल्या आहेत. ( Dr. Neelam gorhe reaction on pune lal mahal lavani controversy )

हे देखील पाहा -

विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पत्रक काढत लाल महालातील नृत्य करणाऱ्यांवर कारवाई करणे, पुणे मनपा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाले, 'सध्या पुणे महानगर पालिकेवर प्रशासक आहे. त्यांनी लोकांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे. स्वतःचे मनमानी कारभार थांबवावेत, अशा शब्दात डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. पुढे गोऱ्हे म्हणाल्या,'लाल महालावर गैरप्रकार घडत असतील, तर याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने समिती करून लाल महालासहित इतर वास्तूकडे लक्ष दिले पाहिजे, असे निर्देश गोऱ्हे यांनी दिली आहे. त्याचबरोबर यात दुर्लक्ष आणि कामचुकार करणाऱ्या वरिष्ठ, कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तर जे कोणी ठेकेदार आहेत त्यांचे कंत्राट रद्द करण्यात यावेत, अशा सूचनांचे पत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना गोऱ्हे यांनी दिले आहे.

लाल महालावर नृत्य करणाऱ्या वैष्णवी पाटीलने मागितली माफी

पुण्यातील लाल महालामध्ये लावणी नृत्याचा व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी राज्यभरात निषेध नोंदवण्यात आला. त्या ऐतिहासिक वास्तूमध्ये नृत्य करणाऱ्या वैष्णवी पाटीलसह तिच्या साथीदारांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवीच्या या कृत्यावर सोशल मीडियावर पडसाद उमटले. त्यानंतर वैष्णवीने जनतेसमोर माफीनामा सादर केला आहे. तिनं सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत जाहीर माफी मागितली आहे. 'अनावधनाने माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा',अस ती या व्हिडीओत म्हणाली आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नाशिकमध्ये शांतिगीरी महाराज यांनी भरला शिंदे गटाकडून अर्ज?

Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत मोठा ट्वीस्ट! शांतिगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून भरला उमेदवारी अर्ज

Video: Abhijeet Patil भाजपला मदत करणार? फडणवीसांच्या भेटीनंतरचं उत्तर चर्चेत!

Harsul Sawangi Road Accident: बाईकवरून तोल गेला अन् महिला खाली कोसळली; पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडलं

Shirur Loksabha Election: अमोल कोल्हे-आढळराव पाटील दोघेही एकमेकांच्या पडले पाया, पाहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT