उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. मनोहर बनसोडे हे महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या यात्रेत आरोग्य सेवा करत होते. रात्री गर्दी कमी झाल्याने ते आपल्या घरी जाण्यास निघाले. घरी जात असताना, कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याजवळील पेट्रोलपंपावर त्यांनी पेट्रोल भरलं. पेट्रोल पंपावरून बाहेर येताच, युनूस मुलानी आणि अन्य दोन वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवलं. तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप डॉ. मनोहर बनसोडे यांच्यावर केला.
मी जिल्हा शल्यचिकित्सक आहे. मी कधीच दारू पीत नसल्याचं डॉ. बनसोडे यांनी सांगितलं. 'तुमच्या कपाळावर तुम्ही जिल्हा शल्यचिकित्सक असल्याचं लिहिलं आहे का?' अशा उर्मट भाषेत त्यांनी डॉ. बनसोडे यांच्यासोबत वर्तन करत अपमानास्पद वागणूक दिली. इतक्यावरच ते पोलीस थांबले नाहीत. आमच्या सोबत पोलीस स्टेशनला चला, तुमची मेडिकल टेस्ट करावी लागेल असं त्यांनी डॉ. बनसोडे यांना सांगितलं.
तिनीही वाहतूक पोलीस मध्यधुंद असल्याचे लक्षात येताच डॉ. बनसोडे यांनी म्हटले की, आपण सगळे कुठल्याही शासकीय रुग्णालयात जाऊ, मात्र तिथे माझ्यासोबतच तुम्हा तिघांचीही मेडिकल टेस्ट करू, असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर डॉ. बनसोडे यांना रुग्णालयाकडे घेऊन निघालेल्या वाहतूक पोलीसांनी त्यांना रस्त्यात उतरवून अक्षरशः पळ काढला.
डॉ. मनोहर बनसोडे यांनी दाखवलेली धीटपणा आणि प्रसंगावधान वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी तातडीने ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली असून, आता नागरिकही या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत आहेत. सार्वजनिक सुरक्षेसाठी जबाबदार असणाऱ्या पोलिसांनीच मद्यपान करून अशी वर्तणूक करणे, हा समाजासाठी धोक्याचा इशारा आहे.
Edited By -Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.