Dr.Ajit Ranade Saam TV
मुंबई/पुणे

Dr.Ajit Ranade : गोखले इन्स्टिट्यूटचे अजित रानडे यांचा अखेर राजीनामा; तात्काळ कुलगुरू पद सोडण्याचा निर्णय

Dr. Ajit Ranade Resignation : अजित रानडे यांनी संस्थेला राजीनामा लिहित तात्काळ पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिला आहे.

Ruchika Jadhav

गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू अजित रानडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे अजित रानडे यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. अजित रानडे यांनी संस्थेला राजीनामा लिहित तात्काळ पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी समितीकडून संस्थेत गैरव्यवहार केल्याचा आरोप अजित रानडे यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा अशी चर्चा सध्या सुरू आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गोखले इन्स्टिट्यूटचे तत्कालीन कुलपती दिवंगत बिबेक देबराय यांनी गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू अजित रानडे यांना कुलगुरू पदावरून तडका फडकी हटवलं होतं. त्या विरोधात अजित रानडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, त्यावेळी उच्च न्यायालयाने रानडे यांच्या हकालपट्टीला स्थगिती दिली होती. तसेच, रानडे यांच्या याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने रानडे यांची गोखले इन्स्टिट्युटच्या कुलगुरू पदावरून करण्यात आलेल्या हकालपट्टीवर ताशेरे ओढले होते.

उच्च न्यायालयाने रानडे यांना कुलगुरू पदावरून हटवण्याबाबत अनियमितता झाल्याचे म्हटलं होतं. न्यायालयाच्या या टिप्पणीनंतर संस्थेचे कुलपती बिबेक देवराय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता अजित रानडे यांनीही स्वतःहून गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदाचा राजीनामा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

October Heat - Heart Attack : ऑक्टोबर हीटमध्ये 'ही' १ चूक पडू शकते महागात, वाढतो हार्ट अटॅकचा धोका

Maharashtra News Live Update: पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनात धनंजय मुंडे भेटीसाठी दाखल

तुकाराम मुंढेंच्या FDA ची दणकेबाज कारवाई! CIPLA फार्माला दिला मोठा झटका; गोदामाचे औषध विक्री परवाने रद्द

Vaginal discharge: योनीतून पांढरा स्राव होणं सामान्य की संसर्गाचे लक्षण? महिलांनो ‘हे’ बदल दुर्लक्षित करू नका

Best Lipstick For Woman: महिलांसाठी बेस्ट लिपस्टिक! 5 ट्रेंडी आणि सुंदर शेड्स

SCROLL FOR NEXT