Panvel News Saam tv
मुंबई/पुणे

Panvel News: करणी सेनेच्या अजय सेंगर यांना आंबेडकरवाद्यांकडून मारहाण; पनवेलमधील घटना

dr babasaheb ambedkar followers beaten to ajay singh senagar : करनी सेनेच्या महाराष्ट्र प्रमुख अजय सेंगर यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई: करणी सेनेच्या महाराष्ट्र प्रमुख अजय सेंगर यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. संविधानाबद्दल अजय सेंगर यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करत या आंबेडकरवाद्यांनी मारहाण केली आहे. पनवेलमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांना पनवेलच्या अग्निशमन केंद्राजवळ जबर मारहाण करण्यात आली आहे. २ आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. संविधानाबद्दल अजय सिंह सेंगर यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याने त्यांना मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण आहेत अजय सिंह सेंगर?

करणी सेनेच्या महाराष्ट्र प्रमुख अजय सिंह सेंगर हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. नथुराम गोडसेची जयंती साजरी करणे तसेच महात्मा गांधी यांची जयंती काळा दिवस म्हणून साजरी करणे अशी अनेक वादग्रस्त कृत्य अजय सिंह सेंगर यांच्यातर्फे करण्यात येतात.

आता काही महिन्यांपूर्वी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातर्फे लिखित भारतीय संविधानाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत संविधान बदलण्याची मागणी केली होती. सेंगर यांच्या या वक्तव्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली होती. काही संघटनांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

याच वक्तव्यामुळे पनवेल येथे दोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांमार्फत अजय सिंह सेंगर यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी अजय सिंह सेंगर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. तसेच पनवेल शहर पोलीस या मारहाण प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT