Ajit Pawar On Raj Thackeray, Ajit Pawar latest Marathi news updates Saam Tv
मुंबई/पुणे

कुणीही अल्टीमेटमची भाषा करू नका; अजित पवारांचा थेट इशारा

राज्यात कुणीही अल्टीमेटमची भाषा करु नका असा अप्रत्यक्ष इशारा अजित पवार यांनी राज ठाकरे यांना दिला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल ४ मेपासून भोंग्याविरोधात राज्यात आंदोलन सुरु केले आहे. काल राज्यभरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यापार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. राज्यात कुणीही अल्टीमेटमची भाषा करु नका असा इशारा अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता दिला. (Ajit Pawar latest Marathi news)

३ मे रोजी या आंदोलनाची खूप चर्चा झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला. जे कोणी कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण करेल अशा लोकांना नोटीसा दिल्या आहेत. सर्वांना नियम सारखे राहतील. आम्ही उत्तर प्रदेशातील माहिती घ्यायचा प्रयत्न केला. तिथल्या सरकारने गोरखपूर मधील मठावरील भोंगे उतरवले आहेत. यानंतर तिथल्या प्रमुखांनी आवाहन केले आहे, त्यांनी यासंदर्भात आदेश काढले नाहीत. या संदर्भात अधिकृत दुजोरा पोलीस देत नाहीत, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

आपल्याकडे कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती होऊ नये. सुप्रिम कोर्टाने दिलेली नियमावली कोणीही मोडू नये. राज्यात जातीय सलोखा राहण्यासाठी, कोणाच्याही भावनिक आवाहानाला बळी पडू नका असे आवाहन अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

कायदा कोणीही हातात घेऊ नये. आपण याअगोदर सामोपचाराने भोंग्यावर तोडगा काढत होतो. जागरण गोंधळ, हरिणाम सप्ताह सुरु असते, तसेच सर्व धार्मिक स्थळांवर निर्णय घ्यावा लागणार आहे. असंही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. राज्यात हुकूमशाही नाही, कुणीही अल्टीमेटम देवू नये. कोणीही घरात बसून अल्टीमेटम दिला तर पोलीस कारवाई करतील असा नाव घेता अजित पवार यांनी राज ठाकरे यांना इशारा दिला. कायद्याने सरकार चालू असतात. सर्वांना नियम सारखे आहे. असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

राज्यातील अजुनही काही मंदिरांनी भोंग्याची परवानगी घेतली नसेलतर ती परवानगी घ्यावी. परवानगी घ्यायला थोडा वेळ लागेल पण ती सर्वांनी घ्या. आपल्याला वातावरण बिघडवायचे नाही. पण परवानगी घेतली नाहीतर कारवाई होईल असा इशाराही अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT