बुलढाणा : भाजपनेते किरीट सोमय्या यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्यावर एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल आपलं अभिनंदन असं म्हटलं होतं. तर मविआ सरकारवर बोलतानाही त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली होती. सोमय्यांच्या याच वक्तव्याचा समाचार बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी घेतला आहे.
आता शिवसेना संपली असं किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) समजू नये. ही तीच शिवसेना आहे व आम्ही सत्तेत भाजपा-शिवसेना युती म्हणून काम करतोय. आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब, उद्धव साहेबांबद्दल आमची श्रद्धा नाही, असा समज किरीट सोमय्यांनी करून घेऊ नये.
पाहा व्हिडीओ -
शिवाय यापुढे त्यांनी अशी वक्तव्ये करू नये, अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही, असा इशाराच आ.संजय गायकवाड यांनी दिला आहे. यामुळे आता भाजपा व शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर येत असल्याचे चित्र आहे.
टोल नाक्यावर पंढरपूर जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवू नये -
पंढरपूर (Pandharpur) जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफी केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली तरीही टोल नाक्यावर टोल वसूल केला जात असल्याचे अनेक फोन मला आले. त्यामुळे मी टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांना आवाहन करतो की वारकऱ्यांना त्रास न होता त्यांची वाहने जाऊ द्यावी. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देखील आ.गायकवाड यांनी दिला आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.