Dombivali News Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli: देवपूजा करताना अनर्थ! दिव्याची वात अंगावर पडली, महिलेचा होरपळून मृत्यू

Woman Dies in Dombivli After Clothes Catch Fire During Puja: देवपूजेच्यावेळी देवघरातील दिव्याची पेटती वात कपड्यावर पडल्याने एका ४८ वर्षीय विवाहित महिला गंभीर होरपळली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Bhagyashree Kamble

देवपूजा करताना देवघरातील दिव्याची पेटती वात कपड्यांवर पडल्यानं एक महिला गंभीर होरपळली. तिला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले असता, उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच महिलेच्या पतीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अर्चना धर्मेंद्र कुमार (वय वर्ष ४८) असे मृत महिलेचं नाव आहे. मृत महिला डोंबिवली पूर्वेतील साई सिद्धी अपार्टमेन्टमध्ये पती आणि मुलासोबत राहत होती. २६ एप्रिल रोजी अर्चना घरात देवपूजा करत होती. देवपूजा करत असताना अचानक दिव्याची पेटती वात तिच्या कपड्यांवर पडली. कपड्यांनी त्वरीत पेट घेतल्यामुळे महिला घाबरली, ओरडू लागली. महिला गंभीररित्या भाजली.

घटनेनंतर महिलेला तातडीने स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक खालावल्यानं पुढील उपचारासाठी डोंबिवलीतील एम्स रूग्णालयात हलवण्यात आलं. दुर्देवाने २७ एप्रिल रोजी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अर्चनाचे पती धर्मेंद्र कुमार यांच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश बंडगर या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, संपूर्ण कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT