Dombivli Police News Saam tv
मुंबई/पुणे

Police Viral Video : पोलीस दारू पिऊन २० रुपये हप्ता घ्यायचा, डोंबिवलीतील हवालदाराचा व्हिडिओ व्हायरल

Dombivli Police News : डोंबिवलीत पोलीस हवालदार दारूच्या नशेत हप्ता घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मनसेने संतप्त प्रतिक्रिया देत कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे. घटनेची चौकशी सुरू असल्याचे पोलीस म्हणाले.

Alisha Khedekar

डोंबिवलीतील पोलीस हवालदार टिकेकर यांचा व्हिडिओ व्हायरल

हवालदारावर दारू पिऊन हप्ता घेतल्याचा आरोप

कारवाई न झाल्यास उपोषण करू मनसेचा संतप्त इशारा

पोलिसांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

डोंबिवलीतून धक्कदायक बातमी समोर आली आहे. शहरातील एका पोलीस हवालदाराचा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पोलीस हवालदार दारू पिऊन हप्ता मागत असल्याचं समोर आलं आहे. या घटनेने डोंबिवली शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर मनसे ऍक्शन मोडवर आली असून कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नाही, तर आम्ही उपोषण करू अशा इशारा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील खांबलपाडा परिसरात टिळक नगर पोलीस ठाण्याचे हवालदार टिकेकर यांचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत असताना टिकेकर हे क्रिकेट टर्फ, हातगाडीवाले, टेम्पो चालकांकडून २० रुपये हप्ता घेत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

या प्रकरणानंतर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला भर रस्त्यात जाब विचारत गोंधळ घातला. मनसे कार्यकर्ते कुणाल चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं पोलीसच दारू पिऊन हप्ता घेत असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कुठे शोधायचा? जर या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नाही, तर आम्ही उपोषण करू अशा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेबाबत टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कदम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले हवालदार टिकेकर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात हे समोर आले आहे की काही फेरीवाल्यांवर सुरू असलेली कारवाई थांबवण्यासाठी अनधिकृत फेरीवाल्यांनी मनसेचा आधार घेतला असावा. सर्व बाबींची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Back Designs: ट्रेंडी आणि यूनिक बॅक ब्लाउज डिझाईनसाठी 'हे' पॅटर्न नक्की ट्राय करा

Hair Care Tips : महिलांनो भांगात कुंकू भरताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर होईल मोठे नुकसान

Bandra-Worli sea link : २५० च्या स्पीडने पळवली लँबर्गिनी, मुंबईतील सी लिंकवरील व्हिडिओ

Maharashtra Live News Update: सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात

Breaking : धक्कादायक! मुंबई, नागपूरसह ४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT