Police detain accused father in Dombivli after shocking child abuse case comes to light Saam Tv
मुंबई/पुणे

डोंबिवली हादरली! नराधम बापाकडून दोन सख्या मुलींवर लैंगिक अत्याचार

Dombivli Father Physical Abuse Case Arrested: डोंबिवलीमध्ये बापानेच दोन सख्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मानपाडा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवली शहरात बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फसणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आपल्या दोन सख्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका नराधम बापाला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा कारपेंटरचे काम करत असून त्याला चार मुली आहेत. यापैकी एका मुलीचे वय १९ वर्षे तर दुसऱ्या मुलीचे वय १० वर्षे आहे. दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच समोर आली. तसेच १९ वर्षीय मुलीवर सुमारे एक वर्षापूर्वी आरोपी बापाने अत्याचार केल्याची बाब तपासात उघड झाली आहे.

या संपूर्ण प्रकाराची माहिती काही जागरूक नागरिकांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली.

आरोपीने आपल्या इतर मुलींसोबतही अशाच प्रकारचे कृत्य केले आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणात मुलींच्या आईची भूमिका काय होती, याचाही तपास मानपाडा पोलीस विविध अंगांनी करत आहेत. या घटनेनंतर डोंबिवली परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT