Dombivli School Urges Citizens google
मुंबई/पुणे

Dombivli News: एक दिवाळी अशी ही...! गतिमंद विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम; विक्रीसाठी बनवलं कंदील, ग्रीटिंग कार्ड आणि बरंच काही

Diwali Exhibition: डोंबिवलीतील संतोष इन्स्टिट्यूटच्या स्वमग्न विद्यार्थ्यांनी बनविलेल्या दिवाळी वस्तूंच्या विक्री प्रदर्शनाला भेट देऊन नागरिकांनी या मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन शाळेकडून करण्यात आले आहे.

Sakshi Sunil Jadhav

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही न्युज

दिवाळीच्या घरेदीला आता अख्या महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. बाजारात कंदील, पणत्या, लाईटींग, गिफ्ट्स अशा अनेक साहित्याची विक्री मोठ्या संख्येने होत आहे. त्यातच डोंबिवलीतील एका शाळेने एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. त्यामध्ये स्वमग्न मुलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे उद्दिष्ट या शाळेने घेतले आहे.

डोंबिवली पूर्वे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या 'संतोष इन्स्टिटयूट फॉर मेंटली चॅलेज चिड्रन' या शाळेत स्वमग्न विद्यार्थ्यांनी बनविलेल्या दिवाळीच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आले आहे. या शाळेत अनेक वर्षापासून दिवाळी सणासाठी स्वमग्न विद्यार्थी कंदील, पणत्या तसेच दिवाळी सणाला उपयोगी असणाऱ्या वस्तू बनवून त्याची विक्री करतात . यामध्ये अगरबत्ती. पणत्या, कंदील, पेपरबॅग, रांगोळी. ग्रीटिंग कार्ड अशा वस्तूंचा यात समावेश आहे.

त्यातून मिळणारे उत्पन्न याच मुलांच्या भविष्यासाठी खर्च केले जाते. तसेच या उपक्रमामुळे स्वमग्न मुलाना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत व्हावी हा यामागचा उद्देश आहे. यावर्षीही शाळेत या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या दिवाळीच्या वस्तू प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवल्यात आल्या आहेत. या शाळेचे प्रमुख डॉ. दत्ताराम फोंडे यांनी सांगितले.

नागरिकांनी या प्रदर्शननाला नक्की भेट द्यावी व या मुलांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांच्या जडण घडणीत आपले योगदान द्यावे. आपल्या या वस्तू खरेदी केल्यामुळ या विद्यार्थ्याना एक मदतीचा हात मिळणार असल्याचे फोंडे सर यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात अशा विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याने नक्कीच मुलांना आर्थिक दृष्ठ्या सक्षम होण्यासाठी मदत होते. तुम्हीही या ठिकाणी जाऊन मुलांना मदतीचा एक हात पुढे करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Treatment: गूड न्यूज! कॅन्सर कायमचा नष्ट होणार; तज्ज्ञांना मिळालं सोल्युशन

Maharashtra Live News Update: राज्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता

Crime News : दुचाकीवरून घेऊन गेला, वाटेत कॅनॉलमध्ये बुडवून मारलं; जन्मदात्या बापाने घेतला ७ वर्षाच्या मुलीचा जीव

Sunetra Pawar Oath Ceremony : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला उपस्थित राहणार? शरद पवारांचं मोठं विधान

Baramati Name History: 'बारामती' हे नाव कसं पडलं? खरा इतिहास काय आहे?

SCROLL FOR NEXT