Fact Check about Railway Ticket social media viral  Saam tv
मुंबई/पुणे

Fact Check : डोंबिवली ते घाटकोपर रेल्वे तिकीट गुजराती भाषेत नाहीच, ते मराठीतच; तिकीट निरखून बघितलं तर सत्य कळेल

Fact Check about Railway Ticket social media viral : गुजराती भाषेत तिकीट असल्याचे दावा करणारे तिकीट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Vishal Gangurde

Mumbai Dombivli local train ticket

मध्य रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्थानकामधील रेल्वे तिकीट गुजराती भाषेत असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डोंबिवली स्टेशनवरील रेल्वे तिकीट हे ६ मार्चला छापल्याचे दिसत आहे. तिकीट छापणाऱ्या प्रिंटरमध्ये बिघाड झाल्याने या स्वरुपातील तिकीट दिसत आहे, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. गुजराती भाषेत तिकीट असल्याचे दावा करणारे तिकीट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. (Latest Marathi News)

मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर लाखो लोक प्रवास करतात. याच मार्गावरील डोंबिवली रेल्वे स्टेशनवरील तिकीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तिकीटावरील भाषा गुजराती असल्याचा दावा काही प्रवाशांकडून केला जात आहे.

या तिकीटावरून सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. तसेच सोशल मीडियावर प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनावर टीका केली जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिकीटावरून नेत्यांकडून उलटसुलट प्रतिक्रिया

प्रवाशांकडून तिकीट गुजराती असल्याचा दावा करत नाराजी व्यक्त केली जात आहे. या तिकिटावरून राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या तिकीटावरून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून टीका रेल्वे प्रशासनावर टीका केली जात आहे.

रेल्वेकडून व्हायरल तिकीटाबाबत स्पष्टीकरण

सोशल मीडियावर व्हायरल झालेला तिकीटावरून रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'सोशल मीडियावर व्हायरल झालेले ते तिकीट मराठीतच छापलेले आहे. डॉट मॅट्रिक्स या प्रकारचा प्रिंटर आपल्याकडे तिकिटे छापण्यासाठी वापरला जातो. यामध्ये काही रेषा या छापल्या गेलेल्या नाहीत. आपण काळजीपूर्वक तिकीट पाहिल्यास ते मराठीतच छापलेले आहे हे सहज समजू शकते, असं स्पष्टीकरण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील धनराज निला यांनी दिलं आहे.

दरम्यान, गुजराती भाषेत घाटकोपर ते डोंबिवली हे लिहायचं झालं तर 'ડોમ્બિવલી થી ઘાટકોપર' असं लिहिलं जातं. त्यामुळे त्या तिकाटीवरील मजकूर हा गुजराती भाषेत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

BJP MLA Death: भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे निधन, ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jio Home Offer: Jio ची जबरदस्त ऑफर! ६० दिवस मोफत इंटरनेट, १००० टीव्ही चॅनेल आणि OTT अ‍ॅप्स फ्री

Manmad : नगर- मनमाड महामार्गावर अग्नितांडव, हार्वेस्टर वाहनाला भीषण आग |VIDEO

Maharashtra Live News Update: संघटीत गुन्हा निष्पन्न, बागूल टोळीवर मोक्का लावण्याच्या हालचाली सुरू

SCROLL FOR NEXT