Dombivli MIDC Fire Saam tv
मुंबई/पुणे

Dombivli MIDC Fire: डोंबिवली MIDC मधील कंपनीत मोठा स्फोट; जमीन थरथरली, घरांच्या काचा फुटल्या, आगीचे लोळ अन् धुराचे लोट

Dombivli Fire News: डोंबिवलीतून कंपनीत स्फोट झाला आहे. एमआयडीसीच्या दुसऱ्या फेजमधील कंपनीत झालेल्या स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवलीत एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळं भीषण आगही लागली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या परिसरातील जमीन थरथरली. तर काही घरांच्या काचाही फुटल्या. आगीचे लोळ आणि धुराचे लोटांनी आकाश अक्षरशः काळवंडलं होतं. या दुर्घटनेत पाच ते सहा नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

डोंबिवलीतील एमआडीसी कंपनीत भीषण स्फोट झाला. कंपनीत भीषण स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची घटना घडली. कंपनीला आग लागल्यानंतर परिसरात आणि आकाशात धुराचे लोट पसरले. त्यामुळे परिसर अक्षरशः काळवंडला होता.

या भीषण स्फोटानंतर परिसरात राहणारे नागरिक घाबरले. भीषण स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या आहेत. या कंपनीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं प्रयत्न सुरु आहेत.

या स्फोटाच्या घटनेत ५ ते ६ कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

कंपनीतील कर्मचारी जखमी

कंपनीत भीषण स्फोट झाल्यानंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांची एकच धावाधाव झाली. या कंपनीतील 30 हून कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. स्फोट झाल्यानंतर परिसरात घरांच्या काचा फुटल्या. भीषण स्फोटानंतर लागलेली आग आता दुसऱ्या कंपनीत देखील पसरत असल्याची माहिती मिळत आहे.

या आगीतील जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या स्फोटाच्या घटनेनंतर पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसरातील नागरिकांना घटनास्थळापासून दूर जाण्यास सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाच आदिवासी शेतकऱ्यांनी केले विष प्राशन, राजुरा एसडीओ कार्यालयातील धक्कादायक घटना

Cleaning Hacks : तुम्ही देखील कपडे धुताना जास्त डिटर्जंट वापरताय? ही चूक ठरू शकते धोकादायक

भाजपचे नवनियुक्त मंत्र्याचे निधन! पक्षाचा अनुभवी चेहरा हरपला; राजकीय वर्तुळात हळहळ

CBSE Result 2026: दहावी, बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट, या दिवशी लागण्याची शक्यता

Kanda Papad Chutney: ५ मिनिटांत घरच्या घरी तयार करा पापडाची चटपटीत चटणी, कुरेकुरे-चिप्सला विसराल

SCROLL FOR NEXT