Dombivli MIDC Fire Update Saam Digital
मुंबई/पुणे

Dombivli MIDC Fire Update : डोंबिवली MIDC दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; CM एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Dombivli MIDC Blast Latest Update in Marathi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसंच त्यांनी आज एम्स रुग्णालयात जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.

Sandeep Gawade

डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात ८ जण मृत्यूमुखी पडले आहेत, तर ६० हून अधिक गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसंच त्यांनी आज एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.

डोंबिवलीतील एमआयडीसीत अमुदान केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जखमींचा आकडाही 64 वर पोहोचला आहे, त्यांच्यावर उपचार सुरू असून मृतांच्या नातेवाईकांच्या दु:खात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसंत जखमींवर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना सर्व मतद केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

रिॲक्टरचा स्फोट होऊन दुर्घटना घडल्या घडली असून या स्फोटाची झळ बाजूच्या ६ कंपन्यांना बसली आहे. या कंपन्यांमध्ये अद्यापही काही कामगार अडकून पडले आहेत. त्यांच्या वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचंही ते म्हणाले.

राज्यातील एमआयडीसींमधील कंपन्यांची आता अ, ब आणि क अशी वर्गवारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण, औद्योगिक, औद्योगिक सुरक्षा, कामगार विभाग यांच्याकडून आढावा घेण्यात येणार आहे. डोंबिवली एमआयडीसीतील धोकादायक कंपन्या तात्काळ बंद केल्या जाणार आहेत. . ज्या कंपन्यांना बदल करायचे नाहीत ते उद्योग शहराबाहेर भूसंपादित केलेल्या जागेत स्थलांतरित केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT